लाइफस्टाइल

Summer Health Problems : उन्हाळ्यातल्या या आजारांकडे करू नका दुर्लक्ष; जीवही जाऊ शकतो!

उन्हाळ्यात जास्त धोका पोट विकार होण्याचा असतो

Pooja Karande-Kadam

Summer Health Problems : प्रत्येकवर्षी अनेक लोक कोणत्या आजारामुळे नाही तर ऋतूबदलामुळेही आजारी पडतात. ऋतूबदल झाल्याने शरीरावर इफेक्ट होणं ही सामान्य गोष्ट असली तरी देखील अनेकांचा यात जीवही जातो. सध्या कडक उन्हाळ्याचा सिझन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना गर्मीचा त्रास होत आहे.

हवामानातील बदलामुळे किंवा अचानक उष्णतेमुळे लोकांना पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांमध्ये ताप, अतिसार, डोकेदुखी, थकवा, उलट्या, मळमळ, चक्कर येणे, पोटात जळजळ, ओटीपोटात पेटके यांचा समावेश आहे.

या समस्यांमागे काही कारणे प्रामुख्याने आढळतात. बदलत्या ऋतूत पोटाच्या समस्या टाळण्याचे उपाय ही जाणून घेणे गरजेचे आहे. हवामानामुळे पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्याचे उपचार काय आहेत. नवी दिल्लीतील प्राइमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे एचओडी इंटरनल मेडिसिन डॉ. अनुराग सक्सेना यांनी या हवामान बदलावर काही गोष्टी सांगितल्या आहेत.

आपल्या शरीराचे तापमान वर्षातील सर्व ऋतूत ३७ अंशाच्या खाली राहावे, अशी निसर्गाची योजना असते. त्यासाठी शरीरात एक ‘तापमान-संतुलन-व्यवस्था’ असते. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला घाम जास्त येतो आणि तो वाळताना शरीरातील उष्णता वापरली जाऊन शरीराचे तापमान वाढत नाही. या उलट थंडीत आपल्याला घाम कमी येतो. या तापमान-संतुलन-व्यवस्थेवर तीव्र उन्हाळ्यात फार ताण पडला तर ती बिघडून उष्माघात होऊ शकतो.

तीव्र उन्हाळा असल्यास म्हणजे हवेचे तापमान नेहमीपेक्षा ५ सेंटिग्रेडने वाढल्यास किंवा ४५अंशांपेक्षा जास्त झाल्यास उष्माघाताची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत तहान नक्की भागवावी. त्यासाठी वारंवार म्हणजे दर तासाला एक ग्लास पाणी प्यायला हवे व दिवसातून तीन-चार वेळा तरी पाण्यात, लिंबू-सरबतात किंवा ताकात मीठ मीठ घालून प्यायला हवे.

पोटाच्या समस्येची कारणे

उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे अन्नाद्वारे पोटात जाणारे व्हायरस किंवा बॅक्टेरिया येतात, ज्यामुळे व्यक्तीला पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. त्याला या गोष्टी कारणीभूत असतात.

  • अस्वच्छ ठिकाणी खाणे

  • जंक फूड जास्त खाणे

  • मसालेदार जेवणाचे सेवन कमी करा

  • मद्यपान आणि धूम्रपान

  • हाय पॉवर औषधे घेणे

  • बराच वेळ उपाशी राहणे

  • जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन करणे

पोटाच्या समस्येची लक्षणे

- ताप येणे

- डोकेदुखी

- पोटात जळजळ

- पोटात पेटके येणे

- उलट्या किंवा मळमळ

- अस्वस्थ वाटणे

- अतिसार समस्या

उन्हाळ्यात अशी घ्या काळजी

  • घाणेरड्या ठिकाणी अन्न खाणे टाळा

  • जंक फूडचे सेवन टाळा

  • अन्न खाताना स्वच्छतेची काळजी घ्या

  • हात धुवून अन्न खा.

  • स्वत: ला हायड्रेटेड ठेवा

  • शुगर, बीपी प्रॉब्लेम वगैरे आजारावर नियंत्रण ठेवणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT