summer indoor allergic reaction: Sakal
लाइफस्टाइल

Allergy: घरातील 'या' गोष्टींमुळे वाढू शकते अ‍ॅलर्जी, अशी घ्या काळजी

पुजा बोनकिले

summer indoor allergic reaction: देशभरात अनेक राज्यांमध्ये आजकाल अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढत चालले आहे. अ‍ॅलर्जीमुळे लोकांना घसा दुखणे, जळजळ होणे यासारख्या समस्या जाणवत आहेत. तुम्हीही अशा समस्यांनी त्रस्त आहात का?

वैद्यकीय अहवालात असे दिसून आले आहे की या प्रकारच्या इनडोअर अ‍ॅलर्जीच्या समस्येचे विविध दुष्परिणाम होऊ शकतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास श्वसना संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उन्हाळ्याच्या दिवसात हवेतील कोरडेपणा आधीच श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या समस्या वाढवणारा मानला जातो. वाढत्या तापमानामुळे घरातील प्रदूषणाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. घरातील प्रदूषनापासून संरक्षण करण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

घरातील प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात का?

तज्ज्ञांच्या मते, धूळ, बुरशी, पाळीव प्राणी, कोरडी हवा आणि परागकण यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते. यामुळे खोकला, शिंका येणे, नाक बंद होणे, घसा खवखवणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. इतकेच नाही तर घरातील अ‍ॅलर्जीच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने आधीच श्वासोच्छवासाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. घरातील अ‍ॅलर्जीमुळे झोपेच्या समस्या वाढू शकतात. या समस्या टाळण्यासाठी पुढील उपाय करू शकता.

स्वच्छता ठेवावी

घरातील प्रदूषनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी फरशी, कार्पेट आणि परिसर स्वच्छ करावे. यासोबतच घरातील दमट हवा बाहेर जाईल याची काळजी घ्यावी. धुळीपासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी चादर आणि पडदे बदलत राहावे.

डिहायड्रेशन पासून दूर राहावे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना श्वसनाचा त्रास आहे अशा लोकांनी हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करावा. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्यामुळे वातनलिकेत कोरडेपणा आण जळजळ होण्याची समस्या वाढू शकते. यामुळे अ‍ॅलर्जी वाढू शकते. हे टाळण्यासाठी दिवसातून कमीत कमी चार ते पाच ग्लास पाणी प्यावे.

घरातील हवेची गुणवत्ता

घरातील प्रदूषण आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे अनेक घरांमध्ये एअर प्युरिफायरचा वापर केला जातो. घरातील हवेची गुणवत्ता चांगली राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे. घरामध्ये धुम्रपान करणे टाळावे. तसेच घरात किंवा सभोवतालील परिसरात झाडे लावावे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT