sunglasses 
लाइफस्टाइल

उन्हाळ्यामध्ये सनग्लास खरेदी करत आहात! 'या' गोष्टींची घ्या काळजी

उन्हाळ्यामध्ये प्रखर सूर्यकिरणांमुळे आपल्या डोळ्यांना मोठी इजा होते. अशावेळी जर तुम्ही गॉगल खरेदी करत असाल तर या काही गोष्टी ध्यानात ठेवा.

अर्चना बनगे

कोल्हापूर: उन्हाळ्यामध्ये प्रखर सूर्यकिरणांमुळे आपल्या डोळ्यांना मोठी इजा होते. अशावेळी जर तुम्ही गॉगल खरेदी करत असाल तर या काही गोष्टी ध्यानात ठेवा.उन्हाळ्यामध्ये बाहेर पडत असताना तुम्हाला काही गोष्टी जवळ ठेवणे अत्यंत आवश्यकता असते. पाण्याची बॉटल सनक्रीम आणि स्कार्फ बरोबरच तुम्हाला गॉगल अत्यंत आवश्यक आहे .

अनेक जण आपल्या चेहर्‍याला चांगला दिसेल अशा पद्धतीचा गॉगल खरेदी करतात. परंतु अशावेळी आपल्या डोळ्यांना कोणते गॉगल सुरक्षित आहे हे पाहण्याची गरज आहे. कारण सूर्य किरणातून येणारे अल्ट्रावायलेट किरण आपल्या डोळ्याला हानी पोहचवतात. वास्तविक आपण आपले केस आणि त्वचा याच्या सुरक्षितेसाठी काळजी घेतो.अशा वेळी आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

सूर्यकिरणांपासून येणारे अनेक घातक किरणापासून डोळ्याला वाचवण्यासाठी फॅशनेबल चष्म्याच्या ऐवजी चांगल्या पद्धतीचा खरेदी करा हे गॉगल खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

युव्ही प्रोटेक्शन सनग्लास

गॉगल खरेदी करताना हे ध्यानात घ्या की हा गॉगल युव्ही किरणांना 100% रोखू शकतो .अनेक जण या गोष्टीकडे लक्ष न देता गॉगल खरेदी करतात. प्रत्येक गॉगलचे काच युव्ही किरण थांबवू शकत नाहीत. अशावेळी त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे. गुणवत्ता नसलेले काळया रंगाचे गॉगल डोळ्याला हानी पोहोचवू शकतात. यासाठी गॉगलच्या लेन्सचा दर्जा याबाबत चौकशी करा. ती युव्ही किरणाला रोखू शकतात का हेही पहा.

फ्रेमची साईज मोठी घ्या

मोठ्या आकाराचे गॉगल आपल्या डोळ्यांना हानी पोहोचण्यापासून वाचवू शकतात. जर तुम्ही उन्हाळ्याच्या दृष्टीने कपडे खरेदी करत असाल तर मोठ्या आकाराचा गॉगल खरेदी करा. सूर्याच्या किरणा तील हानिकारक घटक आपल्या डोळ्या पर्यंत पोहोचू देत नाहीत याशिवाय उन्हामुळे जे आपल्या त्वचेची हानी होते त्या पासूनही सुरक्षित राहतो.

रंगा वर लक्ष देऊ नका

फॅशनेबल दिसण्यासाठी आपण नेहमीच कलरफुल शेड्स खरेदी करतो. परंतु हे गॉगल सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवू शकत नाहीत. काळा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा काच याबाबत काहीही फरक पडत नाही. काचेच्या रंगा ऐवजी लेन्सची क्वालीटी यावरच अधिक लक्ष द्या.

कसा आवश्यक आहे काचेचा रंग

काचेच्या नॅचरल लुकसाठी तुम्ही ग्री काचेची निवड करू शकता. ज्यांना याबाबत खूपसे माहित नाही ते हा रंग ऑप्शनला ठेवतात. परंतु ज्यांना याबाबतची माहिती आहे ते नक्कीच ब्राउन शेडचा ची निवड करतात . जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर गॉगल खरेदी करताना लेन्सच्या रंगाबाबत योग्य ती काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT