Sunglasses Side Effects: खरं तर सनग्लासेस हे प्रखर उजेट किंवा उन्हापासून आणि धूळ. वारा तसचं प्रदूषणापासून डोळ्यांचं Eyes रक्षण व्हावं यासाठी वापरणं गरजेचं असतं.
मात्र अलिकडे तरुणांमध्ये फॅशन किंवा कूल दिसण्यासाठी सतत सनग्लासेस घालण्याचा ट्रेंड Trend पाहायला मिळतोय. sunglasses side effects are cheap sunglasses bad for your eyes
मात्र तुम्हाला माहित आहे का आवश्यकता नसतानाही सनग्लासेस Sunglasess घालण्याचे आरोग्यावर परिणाम होवू शकता. गरज नसतानाही सतत सनग्लासेस घातल्याने शरीरातील सरकेडियन रिदम बिघडू शकतं आणि याचा आरोग्यावर Health परिणाम होवू शकतो.
सामान्यतः सनग्लासेस सूर्यप्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करतता. मात्र तुम्हाला माहित आहे का यामुळे तुमच्या हार्मोन्सचं नियंत्रण बिघडू शकतं. यामुळे नसोमिया आणि डिप्रेशन म्हणजेच नैराश्याच्या समस्या निर्माण होवू शकतात.
हेल्द ऑप्टिमाइजिंग बायोहॅकर, साइकोलॉजी स्पेशलिस्ट, एंटरप्रेन्योर आणि ग्लोबल स्पीकर टिम ग्रे यांच्यानुसार ‘सतत सनग्लासेस घातल्याने पिनियल ग्रंथींवर याचा वाईट परिणाम होतो. यामुळे मेंदूला काही संकेत जातात की बाहेर ढगाळ वातावरण आहे आणि ते त्वचेला एक्सपोजरसाठी तयार होण्यापासून रोखतात. ’
टीम ग्रेच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगण्यात आलंय की “दिवसा सुर्यातून एक ठराविक वेवलेंथ डोळ्यांपर्यंत पोहचते जी पिट्यूटरी आणि पीनियल ग्रंथींवप प्रभाव टाकते. यामुळे बाहेर ऊन आहे असे संकेत मेंदूला मिळतात.
त्यानंतर त्वचा सुर्याच्या संपर्कात येण्यासाठी तयार होते आणि विटामिन डी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करते. ” मात्र सनग्लासेस घातल्याने हे कार्य बिघडतं.
हे देखिल वाचा-
हेल्ह एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार सनग्लासेस सरकेडियन रिदममध्ये बिघाड निर्माण करतं. ज्यामुळे ताण, इनसोमिया एवढचं काय तर नैराश्य देखील येतं.
टीम ग्रेच्या अभ्यासानुसार सुर्यप्रकाश हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. सुर्यप्रकाश तुमच्या पिनियस ग्रंथीशी जोडलेल्या मेंदूतील हायपोथालेमसला उत्तेजित करण्याचं काम करतं. यामुळे तुमचे हार्मोन्स नियंत्रणात राहण्यास मदत होते.
तज्ञांच्या मते जेव्हा तुमचे डोळे नैसर्गिकरित्या सुर्यप्रकाश शोषत नाहीत तेव्हा तुमचं हार्मोन्सचं चक्र बिघडतं. यामुळे तुमच्या शरीराच्या कार्यासोबतच तुमचा मूड बदलतो. sunglasses side effects
डोळे थकतात
तज्ञांच्या मते गरज नसतानाही सनग्लासेस घातल्याने डोळ्यांना नैसर्गिक सुर्यप्रकाश शोषून घेण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते यामुळे डोळे थकतात. यामुळे अनेकदा दृष्टीवर परिणाम होतो. प्रखर उन्हात, पोहताना किंवा ड्रायव्हिंग करताना सनग्लासेस घालणं योग्य आहे. मात्र ते पूर्ण दिवस घालू नये.
सकाळी गॉगल्स गालू नये
सकाळच्या वेळी ऊन हे फार कडक नसतं अशावेळी गॉगल्स घालू नये. सुर्याची कोवळी किरणं ही डोळ्यांसाठी देखील फायदेशीर असतात. यासाठी कोवळ्या सुर्यप्रकाशात वेळ घालवणं गरजेचं आहे. यामुळे रात्री चांगली झोप येण्यास मदत होते. त्यामुळे सकाळचे १० वाजल्यानंतरच सनग्लासेस घालावे.
तसचं सनग्लासेस घेताना फॅशनपेक्षा काही इतर गोष्टींकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. ज्या सनग्लासेसमुळे UV आणि UVB रेजपासून डोळ्यांचं संरक्षण होईल अशा सनग्लासेसची निवड करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.