Family Sakal
लाइफस्टाइल

हॅप्पी पेरेंटिंग : शैली पालक-बालक संबंधाची

‘आईवडील आणि मूल’ यांच्यातल्या भावनिक संबंधावर खूप संशोधन झालं आहे (चालूही आहे). आज त्यातल्याच एका संबंधावर केलेल्या प्रयोगाबद्दल बोलूयात!

डॉ. सुनील गोडबोले, बालविकास तज्ज्ञ.

‘आईवडील आणि मूल’ यांच्यातल्या भावनिक संबंधावर खूप संशोधन झालं आहे (चालूही आहे). आज त्यातल्याच एका संबंधावर केलेल्या प्रयोगाबद्दल बोलूयात! मेरी आईन्सवर्थ या संशोधिकेनं साधारणतः १९७० मध्ये १०० पेक्षा जास्त ‘शिशुवयातील मुलं आणि त्यांची आई’ यांच्यावर शास्त्रशुद्ध आणि किचकट प्रयोग केला. एका खोलीमध्ये सर्वप्रथम आई आणि मुलाला सोडलं जायचं.

मुलाला खेळायला वेळ दिला जायचा आणि त्यानंतर मुलाला माहीत नसणारी व्यक्ती खोलीत यायची, आईबरोबर बोलायची आणि त्यानंतर आई काही मिनिटांसाठी खोलीबाहेर जायची व परत यायची. या सगळ्याची निरीक्षणं मुलांच्या नकळत घेतली जायची! या संशोधनातून मेरी आईन्सवर्थनं पालक- बालक ॲटॅचमेंट (भावनिक बंध) शैलीचे ३ प्रकार शोधून काढले!

पाठोपाठ मेन आणि सोलोमन या संशोधकांनी चौथी शैली शोधली. त्यानंतर संशोधकांनी या संबंधांचा थेट मोठेपणातील वर्तनाशी संबंध शोधला. या पालक-बालक ॲटॅचमेंट शैलीचे ४ प्रकार बघूयात.

१) सुरक्षित (secure) : ही मुलं पालकांशी छान जवळीक साधून असतात. आई नसेल, तर कावरीबावरी होतात; पण परत आई भेटल्यावर आनंदानं आईजवळ जातात. हीच मुलं मोठेपणी आत्मविश्वासानं वावरतात, नातेसंबंध जपण्यावर भर देतात.

२) चिंताग्रस्त-संदिग्ध (anxious-ambivalent) : ही मुलं नवीन व्यक्ती दिसली, तरी घाबरून जातात. आई बाहेर पडली, तर रडून गोंधळ घालतात आणि आई परत आली, तरीही शांत होत नाहीत. हीच मुलं मोठेपणी कुठल्याच नात्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत.

३) अलिप्त - टाळणारी (avoidant): ही मुलं आईसाठी आग्रही नसतात आणि आई नसली, तरी त्यांना फारसा फरकही पडत नाही. अर्थातच ही मुलं मोठेपणी समाजात अलिप्तपणे वावरतात. भावना व्यक्त करण्यातही कमी पडतात.

४) अव्यवस्थित (disorganized): ही मुलं सर्वार्थानं गोंधळलेली असतात. एका वेळेस त्यांना आई-वडिलांशी काही देणं-घेणं नसतं, तर दुसऱ्या वेळेस घाबरलेलीही असतात. या मुलांना मोठेपणी स्वतःचं पालकपण सांभाळायला जड जातं!

पालकमित्रांनो, या चार शैलींपैकी सध्या आपले आणि आपल्या मुलांचे भावनिक संबंध काय आहेत, हे तुम्ही सहज शोधू शकाल, आणि मग टप्याटप्यानं आपण आपल्या चिमुकल्यांशी खेळून, वेळ देऊन, त्यांच्याशी गप्पा मारून आपली आणि मुलांची सुरक्षित ॲटॅचमेंट शैली कशी विकसित करायची यावर काम करूयात! कारण आश्वासक भावनिक संबंध मुलांना मोठेपणी भावनिक संतुलन सांभाळायला मदत करतील! कदाचित आपल्या म्हातारपणात आपली काळजी घेतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT