Sunscreen Applying Tips esakal
लाइफस्टाइल

Sunscreen Applying Tips : सनस्क्रिन लावण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा त्वचेवर दिसू शकते टॅनिंग

Monika Lonkar –Kumbhar

Sunscreen Applying Tips : सध्या देशातील अनेक भागांमध्ये उष्णता प्रचंड वाढली आहे. काही राज्यांना तर उष्णतेच्या लाटेचा इशारा ही देण्यात आला आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा वाढल्याने आरोग्याच्या ही समस्या निर्माण झाल्या आहेत. या दिवसांमध्ये खास करून आरोग्याची, त्वचेची आणि केसांची काळजी घेणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना त्वचेला सनस्क्रिन अवश्य लावा. यामुळे, सूर्याच्या किरणांचा थेट परिणाम त्वचेवर होणार नाही आणि त्वचा काळवंडणार नाही. त्यामुळे, या दिवसांमध्ये महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रिनचा आवर्जून वापर करतात. परंतु, जर या सनस्क्रिनचा त्वचेवर चांगला प्रभाव पडावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर सनस्क्रिन लावण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

सनस्क्रिन लावताना प्रमाण लक्षात घ्या

त्वचेवर सनस्क्रिन लावताना त्याचे किती प्रमाण असावे? याकडे प्रामुख्याने लक्ष द्या. अनेकांना संपूर्ण शरीरावर सनस्क्रिन लावताना जवळपास एकावेळी २८ ग्रॅम सनस्क्रिनची आवश्यकता असते. सनस्क्रिन लावल्यानंतर ते त्वचेवर पूर्णपणे सुकू द्या. लक्षात ठेवा हे फार महत्वाचे आहे.

SPF आहे महत्वाचे

जर तुम्ही पहिल्यांदाच सनस्क्रिन खरेदी करत असाल तर सनस्क्रिनचा एसपीएफ (SPF) किमान ४० पर्यंत असायला हवा हे लक्षात घ्या. जर तुमच्या सनस्क्रिनमध्ये किमान ४० एसपीएफ असेल तर ते तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेऊ शकेल. शिवाय, यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होईल. थोडक्यात योग्य SPF असलेले सनस्क्रिन तुमच्या त्वचेचे सनबर्नपासून बचाव करण्याचे काम करते.

घरात लावा सनस्क्रिन

अनेकदा लोकांना असे वाटते की, उन्हाळ्यात घराबाहेर पडतानाच सनस्क्रिन त्वचेला लावणे आवश्यक आहे. परंतु, हे चुकीचे आहे. तुम्ही घराबाहेर पडताना सनस्क्रिन लावा. परंतु, यासोबतच घरात असल्यावर ही सनस्क्रिन अवश्य लावा. कारण, घरामध्ये असतानाही सूर्याच्या अतिनील किरणांचा तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरी असतानाही त्वचेवर सनस्क्रिनचा वापर करायला विसरू नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT