- पृथा वीर
नवरात्राच्या सणाची बात न्यारी असते. नवरंगांची उधळण करणाऱ्या फॅशन ट्रेंडला साजेशी फॅशन म्हणजे ब्लाउज बॅक नेकचा ट्रेंड. ब्लाउजच्या मागे एखादा संदेश किंवा एक विषय घेऊन ब्लाउज शिवण्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय होतोय. एखादा मुखवटा किंवा एखादा सण किंवा प्राण्याचे प्रिंट असलेले ब्लाउज खूपच उठून दिसतात आणि साडीचे सौंदर्य खुलवतात. यालाच फॅशन एक्स्पर्ट ‘टॉकिंग ब्लाउज कंटेम्पररी ट्विस्ट’ म्हणतात.
साडी ही फॅशन स्टेटमेंट म्हणून ओळखली जाते. म्हणूनच साडीमध्ये आणि साडीवर असंख्य प्रयोग होतात. पारंपरिक रंगांसोबतच वेगवेगळ्या रंगसंगतीचे प्रयोग होत असल्याने साडीच्या लोकप्रियतेत अजूनच भर पडली आहे. यामध्ये ‘मिडनाईट ब्लू’, ‘फायरी कोरल’, ‘रीगल पर्पल’, ‘बॉटल ग्रीन’, ‘पर्पल’ अशा रंगांच्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत. साडीच्या फॅब्रिकचा विचार केला जात असल्याने हाताने विणलेल्या साड्या महिला, युवतींच्या पसंतीस उतरल्या.
यामध्ये सिल्कच्या साड्यांपासून, खादी कॉटन, सेमी पैठणी, कॉटन, सिल्क - कॉटन, बनारसी, कांजीवरम, टसर सिल्क, बांधणी, पोचमपल्ली, फुलकारी, म्हैसूर सिल्क, कलमकारी, रस्टिक लिननसारख्या कापडापासून बनवलेल्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत. यासोबतच रिसायकल मटेरिअलपासून बनवलेल्या साड्याही ट्रेंडमध्ये आहेत. या साड्यांप्रमाणे ब्लाउजवरही तितकीच मेहनत घेतली जाते. म्हणूनच प्रत्येक साडी स्टाइल स्टेटमेंट झाली आहे.
यात कंटेम्पररी ट्विस्ट म्हणजे सध्या क्लासी कट असलेले ब्लाउज साड्यांसोबत पाहायला मिळतात. हँड एम्ब्रॉयडरी असलेले हाय नेक ब्लाउज किंवा बॅकलेस ब्लाउज पारंपरिक वस्त्रप्रावरणांना आधुनिक टच देतात. ‘टॉकिंग ब्लाउज’ म्हणजे एक संदेश देण्याचा प्रयत्न म्हणून साड्यांसोबत वेगवेगळ्या कटसह ब्लाउज किंवा एक फ्रेम असलेले ब्लाउज शिवले जातात.
शिवाय मॅचिंग ब्लाउज अगदीच मागे पडले नसले तरीही साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउजवर जास्त भर आहे. यामध्ये कॉटन सिल्क ब्लाउज सर्वाधिक चालतात. ब्लाउजच्या मागच्या बाजूस एखाद्या विषयाचे प्रिंट आणि सुंदर भरतकाम असते. यामुळे चारचौघात तुमचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते. यामध्ये ऑर्गनिक रंग वापरले जात असल्याने या ब्लाउजचे बजेट वाढते. तुम्हाला याचे कापड मिळते किंवा तुम्ही ऑनलाईन रेडीमेड ब्लाउज मागवू शकता. यांना इलॅस्टिक असल्याने साइज फ्री असते किंवा पट्टाचित्र असलेले ब्लाउज पीस ऑर्डर करू शकता.
पट्टा-चित्र म्हणजे कापडावर किंवा पट्ट्यावर चित्र काढणे. पंधराव्या शतकाच्या पूर्वीपासून ओडिशात या कलेची भरभराट झाली आहे. यात माती, दगड आणि खनिज रंगांचा वापर पट्ट्यावर रंगविण्यासाठी केला जातो. काळ्या साध्या सुती हॅंडलूम फॅब्रिकवर एक विषय किंवा शुभंकर असलेले पट्टा- चित्र ब्लाउजवर मिळते.
याविषयी महाराणी ब्लाउज, भारतीय संस्कृतीत शुभंकर मानले जाणारे वेगवेगळे प्राणी, मधुबनी ब्लाउजचे पर्याय आहेत. सिल्क आणि पैठणी साडीच्या ब्लाउजवर तुम्ही नथ किंवा कोणतेही शुभंकर चित्र बनवून घेऊ शकता. आरी वर्क करून घेतलेले ब्लाउज बाजारात ट्रेंडिंगमध्ये आहेत.
रंगांचे, कलाकुसरीचे प्रयोग
‘मनमोहिनी फॅशन’च्या संचालिका प्रणाली देशमुख यांनी ब्लाउजचे सध्याचे ट्रेंड सांगितले. सध्या बो टनेक, कफ कॉलर, प्रिंसेंस कट असलेल्या ब्लाउजचा ट्रेंड आहे. महागड्या साड्या असतील, तर आरी वर्कचा उपयोग होतो. ब्लाउज तयार करण्यावर हल्ली खूप मेहनत घेतली जाते, असे देशमुख म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.