काही लोकांना दिवसातून ७ ते ८ कप पोटात गेल्याशिवाय चहा पिल्यासारखं वाटत नाही. इतका चहा त्यांच्या प्रकृतीसाठी चांगला नसतो तरी देखील ते पितच असतात. कामाच्या घाईत, टेन्शनमध्ये, कधी पाऊस चांगला पडतोय, कधी थंडी वाजते या कारणांसाठी एकाहुन जास्त चहाचे कप पोटात रिकामे केले जातात.
घरचे अन् ओळखीचे लोकही अशांना टोमणे मारतात. त्याला बाकी कशाच नाही पण चहाचं व्यसन आहे. काही लेखक स्क्रिप्ट रायटर्सही लिहायला सुचेना म्हणून चहा घेतात. चहा घेणं काही चुकीच नाही. पण, ते प्रमाणाहुन अधिक घेणं जरा चिंताजनक असू शकतं. (Health Tips)
बरेच लोक दिवसभर उपाशी राहतात, परंतु दिवसभरात 10 कप चहा पितात. अशा परिस्थितीत अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे चहाचे व्यसन कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. चहाचे व्यसन कमी करायचे असेल तर काही चुकांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया चहाचे व्यसन कसे संपवायचे?
या विषयावरील चांगल्या माहितीसाठी आम्ही दिल्लीच्या होली फॅमिली हॉस्पिटलच्या आहारतज्ञ सना गिल यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी खरंच पटण्यासारख्या आहेत.
काही लोकांना ग्लास भरून चहा प्यायला आवडतो. ही एक अतिशय वाईट सवय आहे, यामुळे पुन्हा पुन्हा जास्त कॅफीन घेण्याचे व्यसन लागते. चहा किंवा कॉफीसारख्या कॅफिन असलेल्या गोष्टी कमी प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करा.
उपाशी राहणे बंद करा
काही लोक बराच वेळ उपाशी राहतात आणि कामाच्या दरम्यान अनेक कप चहा पितात. अशा परिस्थितीत आपल्याला उपाशी राहण्याची सवय लागते. याशिवाय चहा पिण्याचे व्यसनही होते. चहाचे व्यसन कमी करायचे असेल तर आधी नाश्ता करा. यानंतरच चहा प्या. जेणेकरून तुम्ही चहा मर्यादित प्रमाणातच प्याल.
चहाच्या व्यसनामुळे जर तुम्हाला उकळलेला चहा वारंवार किंवा जास्त वेळ प्यायला आवडत असेल तर ते तुमच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकते. त्यामुळे उकडलेला चहा पुन्हा पुन्हा न पिण्याचा प्रयत्न करा. त्यात कॅफिनचे प्रमाण खूप जास्त होते, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
जर तुम्हाला चहाचे व्यसन सोडायचे असेल, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला चहा प्यावासा वाटतो तेव्हा सर्वप्रथम दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी किंवा इतर हर्बल टी निवडा. याच्या मदतीने तुम्ही चहा पिण्याचे व्यसन बर्याच प्रमाणात आटोक्यात आणू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.