Tea For Weight Loss  esakal
लाइफस्टाइल

Tea For Weight Loss : ब्लॅक की ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी काय आहे जास्त फायदेशीर?

काळ्या चहाचा गोडवा वाढवण्यासाठी साखरेऐवजी या पदार्थाचा करा वापर

Pooja Karande-Kadam

Tea For Weight Loss :

पाण्यानंतर चहा हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे पेय आहे. लोक सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत भरपूर चहा पितात. आजकाल लोक विविध प्रकारचे हर्बल टी देखील पितात. काही हर्बल टी वजन कमी करतात असा दावा केला जातो.

वजन कमी करण्यासाठी हर्बल टी किंवा ग्रीन टीचेही सेवन केले जाते. वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वोत्तम आहे याबद्दल लोक सहसा गोंधळलेले असतात. वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टी आणि ग्रीन टीचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. (Black Tea And Green Tea Benefits For Weight Loss in Marathi)

असे मानले जाते की ब्लॅक टी आणि ग्रीन टीचे सेवन वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण याबाबत अनेकदा गोंधळ होतो, ब्लॅक टी आणि ग्रीन टी मधील वजन कमी करण्यासाठी कोणते जास्त फायदेशीर आहे?

ब्लॅक टी किंवा ग्रीन टी

ग्रीन टी आणि ब्लॅक टी दोन्ही कॅमेलिया सायनेन्सिस नावाच्या वनस्पतीच्या पानांपासून बनवले जातात. काळ्या चहाची पाने वाळवून त्यावर प्रक्रिया करून तयार केली जाते. ग्रीन टी ही सामान्य हिरवी पाने असते, ती बनवण्याची प्रक्रिया थोडी वेगळी असते.

ग्रीन टी बनवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो आणि त्यात अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण काळ्या चहाच्या पानांपेक्षा जास्त असते. आरोग्य हेल्थ सेंटरचे क्लिनिकल डायटिशियन डॉ. व्हीडी त्रिपाठी म्हणतात, "ब्लॅक टी आणि ग्रीन टी यांचे स्वतःचे फायदे आहेत. या दोन्हीचे सेवन करणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणते सेवन करता. (Black Tea And Green Tea Benefits)

वजन कमी करण्यासाठी काळ्या चहाचे फायदे

ब्लॅक टी हा चहासारखाच असतो. पण त्यात दुध नसते. हे तयार करण्यासाठी चहाची पाने आणि पाणी वापरले जाते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टी पीत असाल तर ते बनवताना साखरेऐवजी मधाचा वापर करा. याशिवाय काळ्या चहामध्ये लिंबाचा रस टाकून प्यायल्याने फायदा होतो.

काळ्या चहामध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटी-ऑक्सिडंट आढळते, जे पाचन तंत्र मजबूत करण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करते. संतुलित प्रमाणात काळ्या चहाचे सेवन केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते. लक्षात ठेवा, काळ्या चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते संतुलित प्रमाणातच सेवन करा. (Weight Loss Tips In Marathi)

ग्रीन टी

ग्रीन टीचे सेवन केल्याने केवळ वजन कमी होत नाही तर शरीराच्या अनेक गंभीर समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचा घटक आढळतो, जो वजन कमी करण्यास आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करतो.

ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिन बी, फोलेट, मॅग्नेशियम आणि फ्लेव्होनॉइड्स आढळतात, जे वजन कमी करण्यासोबतच शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी कोणते जास्त फायद्याचे

दोन्ही चहाचे सेवन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. दररोज सकाळी लिंबू आणि मध घालून काळ्या चहाचे सेवन केल्याने तुम्ही वजन कमी करू शकता. संतुलित प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करताना ग्रीन टी किंवा ब्लॅक टीचे सेवन करण्याव्यतिरिक्त आहार आणि व्यायाम इत्यादींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT