Tea Premix esakal
लाइफस्टाइल

Tea Premix : ना गॅस, ना दूध, असे बनवा चहाचे प्रीमिक्स, १ मिनिटात होईल गरम पाण्यापासून मसालेदार चहा

एका प्रसिद्ध शेफने दिलीय ही चहा प्री-मिक्सची रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

Tea Premix :

भारतीयांचे चहाप्रेम तुम्हाला तर माहितीच आहे. सकाळी उठताच चहाचा कप हातात लागणारे लोक आहेत. पण अशा लोकांना बाहेर गेलं की त्रास होतो. कारण, बाहेर सगळे पदार्थ विकत मिळतील पण प्रवासात चहा मनासारखा लागतो.    

चहा मनासारखा नसेल तर प्रवासातला आळस जात नाही. त्यामुळे अनेक लोक प्रवासात चहाच्या तरतरी आणणाऱ्या चवीला जास्त मिस करतात. तुम्हीही चहा प्रेमी असाल तर एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही तुमचा मसालेदार चहा प्रवासात सोबत नेऊ शकता. (Masala Tea)

होय, हे खरं आहे! प्रवासात चहा सोबत घेऊन जाणं शक्य नाही. कारण चहा खराब होणार, तो थंड होणार त्यामुळे चहाची चव मिळणार नाही. पण, आम्ही जो चहा सांगणार आहोत तो तुम्ही सोबत तर नेऊच शकता. पण त्याचबरोबर तो बनवण्यासाठी गॅस, दूध वैगरे काहीही लागणार नाही. काय आहे ही रेसिपी, प्रवासात नेता येईल असा चहा कसा बनवायचा हे पाहुयात.

आज आपण चहाच्या प्री-मिक्सची रेसिपी पाहणार आहोत. मास्टर शेफमध्ये शोमध्ये झळकलेली शेफ नेहा दीपक शाहची ही रेसिपी आहे. हे चहा प्रिमिक्स पावडरच्या स्वरूपात असेल. जे तुम्ही प्रवासात किंवा कुठेही सहज तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता.

जेव्हा तुम्हाला हा इन्स्टंट चहा बनवायचा असेल आणि प्यायचा असेल तेव्हा तुम्हाला फक्त गरम पाण्याची गरज आहे. तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला घरासारखा चहा प्यायला मिळेल.

असे बनवा चहा प्री-मिक्स

इन्स्टंट चहा प्रीमिक्स करण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात 4 चमचे चहापूड टाका. आता या भांड्यात तुमच्या आवडीचे मसाले घाला. सुंठ, वेलची, दालचिनी, लवंग असे मसाले तुम्ही वापरू शकता.  

आता मिक्सरच्या जारमध्ये साखर घाला. आता हे मिश्रण बारीक करून एकदम बारीक पावडर बनवा. आता हे प्रीमिक्स चाळून त्यात मिल्क पावडर मिक्स करा. आता तुमचे इंस्टंट चहा मिक्स तयार आहे. आता ही पावडर हवाबंद डब्यात भरा. तुम्ही हे कुठेही घेऊन जाऊ शकता.

प्रवासात जेव्हा तुम्हाला चहा प्यावासा वाटेल. तेव्हा एका कपमध्ये 2 चमचे मिश्रण आणि गरम पाणी घालून चांगले मिसळा. या चहाला 1 मिनिट भिजू द्या मग ते चांगले मिक्स करा. तुमचा चहा तयार आहे. हा तुम्ही गाळूनही घेऊ शकता.

गरम पाणी

तुम्हाला हा चहा बनवण्यासाठी केवळ गरम पाणी सोबत लागेल. तुम्ही चहा करणार असाल तेव्हा इलेक्ट्रीक केटलनेही पाणी गरम करू शकता. त्यासाठी गॅस वापरण्याची आवश्यकता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT