Tech Tips : हरियाणात राहणाऱ्या एका व्यक्तीला फोन आला. त्याच्या जवळच्या मित्राचा फोन होता. मित्राच्या मुलाला ऍडमिट करावं लागणार होतं आणि त्याला पैशांची गरज होती. त्या व्यक्तीने कोणताही विचार न करता त्याने ५० हजार पाठवले.
पुढे दोन दिवसांनी जेव्हा मुलाची तब्बेत कशी आहे, हे विचारण्यासाठी त्याने मित्राला फोन केला. तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण, त्या मित्राच्या मुलाला काहीच झालं नव्हतं. उलट त्या मित्राने मी तुला फोन केलाच नाही असं सांगितलं. अशीच एक घटना शिमल्यातही उघडकीस आली आहे. हा नक्की विषय काय आहे हे जाणून घेऊयात.
हा एक स्कॅम होता तो ही Artificial Intelligence कडून केलेला. काही लोकांकडून पूर्वी Message आणि link वरून बँक अकाऊंटचे डिटेल्स मागवले जायचे आणि फसवणूक केली जायची. पण सगळीकडेच बोलबाला असलेल्या AI चा वापर करून लोकांना गंडा घातला जात आहे.
AI च्या मदतीने स्कॅमर तुमच्या ओळखीत असलेल्या लोकांचे आवाज काढून तुमच्याशी बोलत आहेत. ज्यामुळे तुम्हालाही तुमच्याच नातेवाईक, किंवा मित्राचा फोन असल्याचे वाटते आणि तुम्ही त्याला पैसे देऊ करता. पण नंतर ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६९ टक्के लोक AI चा आवाज ओळखू शकत नाहीत. तर, जे ओळखतात किंवा पुन्हा खात्री करुन मगच पैसे देतात त्यांचे पैसे सुरक्षित राहतात. AI ने आवाडाचे डबिंग करणे सोपे बनले आहे. त्यामुळेच ऑनलाइन फ्रॉड्स वाढले आहेत. (Artificial Intelligence)
हे कसं काम करतं?
AI किंवा कोणत्याही मशिन लर्निंग सॉफ्टवेअरचा वापर करून कोणाच्याही आवाजाची नक्कल केली जाऊ शकते. यासाठी फक्त त्या व्यक्तीच्या आवाजाची क्लिप हवी असते. याचा वापर करून आणखी कॅरेक्टर्स रेकॉर्ड केले जातात.
असे करण्यासाठी अनेक फ्रि सॉफ्टवेअरही आहेत. ज्याचा वापर व्हॉईस क्लोन बनवण्यासाठी केला जातो. याचाच वापर करून अनेकांची फसवणूकही केली जात आहे. (Online Scam)
यापासून कसं सुरक्षित रहाल
आधी विचार करा
जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल आला, तर पूर्णपणे सतर्क रहा. जरी तुम्हाला वाटत असेल की हा आवाज तुमच्या ओळखीच्या कोणाचा आहे आणि तो तुमच्याकडून पैसे किंवा वैयक्तिक माहिती मागत आहे, तर लगेच हो म्हणू नका. तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारू शकता जे फक्त तुम्हा दोघांना माहीत आहेत. त्यामुळे तुम्ही पडताळणी करू शकता.
काळजीपूर्वक ऐका
येणारा कॉल काळजीपूर्वक ऐका आणि ती बोलण्याची शैली कशी आहे हे ऐका. रोबोट तुमच्याशी बोलत असेल तर तो एखादा शब्द रिपिट करू शकतो. किंवा तो बोलताना मध्येच विचित्र आवाज येऊ शकतो, याकडे लक्ष्य द्या.
पैसे देताना विचार करा
सहसा सायबर गुन्हेगार अशा प्रकारे पैसे फसवतात, जे पैसे परत मिळवणे खूप कठीण असते. जर जास्त पैशांची मागणी होत असेल तर दोनदा विचार करा. त्याचे कारण विचारा. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या नंबरवर कॉल करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.