काॅर्पोरेट जगतातली तणावमुक्ती Esakal
लाइफस्टाइल

तणावमुक्ती Corporate Sector मध्ये काम करणाऱ्यांची!

व्यक्तीच्या क्षमतेला एक मर्यादा असते; मात्र, ही मर्यादा सांभाळली जात नसल्यामुळे जीवनाची वाटचाल तणावपूर्ण बनली आहे. व्यक्तीच्या शरीर, मन व वर्तणुकीवर तणावाचा विविध तऱ्हेने परिणाम होतो. मानसिक ताणामुळे रक्तदाब, हृदयरोग, अपचन, त्वचारोग, निद्रानाश व अपचन इ. प्रकारचे रोग होऊ शकतात

सकाळ डिजिटल टीम

आपले जीवनमान सुधारले असले, तरी जीवनताण वधारले आहेत. ताण हा सर्वव्यापी व सर्वस्पर्शी झाला आहे. वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक पातळीवर आपण तणावयुक्त Tesnsions जीवन अनुभवत आहोत. Tension Free Life for Corporate world People who work Under Tremendous Stress

उपभोगवादी जीवन पद्धती, संपत्तीचा हव्यास, अमर्याद गरजा, समस्याप्रणीत विज्ञान व तंत्रज्ञान Science Technology, स्पर्धा, कामकाजाच्या नवीन पद्धती, वाढीव व्यवहार व जवाबदाऱ्या इ. विविध कारणांमुळे ताण वाढलेला आहे. शारीरिक व मानसिक ताण Mental Stress ही एक गंभीर समस्या बनली आहे.

वैयक्तिक पातळीवरील ताण दूर करण्यासाठी पुढील उपाय करायला हवेत.

ओळखीच्या माध्यमातून मित्र व चाहते यांचे एक जाळे बनवावे. त्यांच्याशी निकटवर्ती संबंध निर्माण करावेत आणि त्यांच्या समवेत वेळ घालवावा.

• नियमित व्यायाम करावा. कोणत्याही परिस्थितीत यात खंड पडू देऊ नये. उदा. आर्ट ऑफ लिव्हिंग, सकाळ-संध्याकाळ पायी फिरणे इ.

• आहारात शक्तिवर्धक खाद्यान्नाचा वापर करावा.

• पुरेपूर विश्रांती घेत राहावे.

• आपण नोकरी करीत असाल तर सहकाऱ्यांशी वार्तालाप करावा.

• खूपच ताण वाढलेला असेल तर अल्पावधी सुटीवर जाऊन यावे.

• कार्यालयात सतत बसून राहावे लागत असेल तर मध्येच काही वेळा पाय जमिनीवर जोराने आपटावेत.

हे देखिल वाचा-

• ज्याची आवड आहे, ज्यात आपण तल्लीन होऊ

शकता, अशी धून ऐकावी किंवा गीत गुणगुणावे.

• डोके अलगदपणे वर्तुळाकार फिरवावे.

• ज्याचा सुगंध आवडतो व मन प्रसन्न होते, अशा फुलांचा सुवास घेत राहावे.

• डोळे मिटवून बोटाने हळुवारपणे वर-खाली व वर्तुळाकार फिरवावे.

अधूनमधून चहा, कॉफी, शीतपेय इ. प्राशन करावे.

सध्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात लाखो व्यक्ती चांगल्या वेतनावर नोकरी करीत आहेत; मात्र, या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असतो. आयटीमधील कर्मचाऱ्यांना आठ ते दहा तास कॉम्प्युटरसमोर बसून काम करावे लागते. कॉम्प्युटरमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी पुढील उपाय अवलंबावेत.

• कॉम्प्युटरसमोर सतत बसून न राहता अधूनमधून फेरी मारावी.

• थोडा वेळ काम थांबवून खांदे, बाहू व मनगटाला विश्रांती द्यावी.

• कॉम्प्युटरच्या स्क्रिनवरील नजर थांबवून भोवताली थोडा वेळ पाहात राहावे.

• प्रत्येक तासानंतर उठून दोन्ही हात लांब करावेत व मानेबाबत हलका व्यायाम करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT