आईपणाचा मनमुराद आनंद sakal
लाइफस्टाइल

आईपणाचा मनमुराद आनंद

मी प्रेग्नंट आहे, असं मला कळलं, तेव्हा ‘सातच्या आत घरात’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार होता. ‘श्वास’ चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि मी ‘इंडियन मॅजिक आय’ संस्थेची लेखिका आणि असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करत होते.

सकाळ वृत्तसेवा

आईपण आणि करिअर

विभावरी देशपांडे

मी प्रेग्नंट आहे, असं मला कळलं, तेव्हा ‘सातच्या आत घरात’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार होता. ‘श्वास’ चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि मी ‘इंडियन मॅजिक आय’ संस्थेची लेखिका आणि असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करत होते. मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शन केलेल्या आणि सचिन कुंडलकर यांनी लिहिलेल्या ‘छोट्याशा सुट्टीत’ या नाटकात मी महत्त्वाची भूमिका साकारत होते. त्याचदरम्यान मला प्रेग्नंट असल्याचं समजल्यानंतर काही गोष्टींवर मर्यादा आल्या. मी मालिका व चित्रपटांमध्ये थोडासा ब्रेक घेण्याचं ठरवलं. मात्र, ‘छोट्याशा सुट्टी’च्या तालमी सुरू ठेवल्या. अगदी पोट दिसायला लागेपर्यंत पाच महिने मी त्या नाटकाचे प्रयोग केले. सुदैवानं प्रेग्नंसी छान पद्धतीनं पार पडली. नाटकाच्या पूर्ण ग्रुपनं चांगल्या पद्धतीनं सांभाळून घेतलं. शेवटचे दोन-तीन महिने मी पूर्ण विश्रांती घेतली. योगासने, श्वसनाचे व्यायाम आणि शारीरिकदृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी मी क्लासेस केले होते.

मी आई झाले, त्यावेळी माझं वय थोडंसं लहान होतं. त्यादरम्यान माझं करिअर खूप वेगानं सुरू झालं नव्हतं. ‘सातच्या आत घरात’ नुकताच प्रदर्शित झाला होता आणि मी ठरवलं, की आता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी स्थिर आहे. आता हीच वेळ आहे आई होण्याची. त्यामुळे ऑनस्क्रीन काम बराच काळ थांबवलं. प्रेग्नंट झाल्यानंतर पहिलं दीड वर्ष मी पूर्णवेळ मुलगी राधाबरोबर होते. ती दीड वर्षाची असताना मी पहिला प्रोजेक्ट केला. त्यावेळी मी बंगळूरला ‘रंग शंकरा’ नाट्यगृहात नाटक बसवायला गेले होते. त्यावेळी राधालाही माझ्यासोबत नेले होते. माझी आईदेखील सोबत होती. त्यानंतर मी दिल्लीला दोन महिने नाटक लिहिण्यासाठी गेले. राधा दीड वर्षाची झाल्यानंतर मी लेखिका आणि दिग्दर्शिक म्हणून काम सुरू केलं. मला नेहमी वाटायचं, की आनंदी असणं आवश्यक आहे. त्यामुळे शांत आणि समाधानी राहण्यासाठी काम करत राहिलं पाहिजे. माझी आई, सासू आणि नवरा यांनी मला खूप साथ दिली. आईपण आणि करिअरचा तसेच कुटुंबाचाही समतोल साधण्यासाठी काय गुण पाहिजे आणि काय नाही, हे विचारात घेतलं. तेव्हापासून मी समतोल साधण्याचा प्रयत्न केला आणि आताही सुरू आहे.

बाळ झाल्यानंतर मला असं कधीच वाटलं नाही, की करिअरवर लक्ष केंद्रित करायला हवं. सुदैवानं, माझ्या कामाचं स्वरूप, प्रसूतीरजा संपल्यावर परत नोकरीला जावं लागेल, असं नव्हतं. मी सर्जनशील क्षेत्रामध्ये असल्यामुळे, एक लेखिका आणि दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याने, पहिलं दीड वर्ष सोडलं तर ट्रॅक सुरूच होता. मी हळूहळू काम सुरु केली. त्याबाबतीत मी काही निर्णय घेतले, ज्यांची मला स्पष्टता होती. उदाहरणार्थ, मी टीव्हीवर अभिनेत्री म्हणून कधीच काम केलं नाही आणि आजही करत नाही. कारण त्याला ज्या प्रकारे टाईम कमिटमेंट द्यायला लागते, ती मला जमणार नव्हती. मी पुण्याची आहे आणि माझं पूर्ण कुटुंब पुण्यात आहे. आमचा नाटकांचा ग्रुप पुण्यात आहे; पण मला मालिकांमध्ये काम करायचं असतं, तर मला २०-२५ दिवस मुंबईत राहावं लागलं असतं. बाळ सांभाळण्यासाठी आई, सासू आणि नवरा पुरेसे होते. तरीही मी टीव्हीवर काम न करण्याचा निर्णय घेतला; कारण मला राधासोबत जास्तीत जास्त वेळ हवा होता. अनेक स्त्रिया समर्थपणे हे करतात, त्यामुळे असं करणाऱ्यांच काही चुकतंय, असं वाटत नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय होता. सुदैवानं मी केवळ अभिनेत्री नसल्यामुळे माझं काम सुरू ठेवू शकले. कधी कठीण प्रसंग आले तरी स्पष्टता होती की, माझी मुलगी लहान असताना माझा प्राधान्यक्रम काय असावा. राधा साडेतीन वर्षांची असताना ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘बालगंधर्व’, आणि ‘नटरंग’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आणि माझ्या ऑनस्क्रीन करिअरची सुरुवात झाली. माझं घर, राधा आणि काम यात समतोल साधण्यासाठी मी प्रयत्नशील राहिले.

आईची कर्तव्यं पार पाडताना आणि करिअर सांभाळताना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखणं थोडं ओढाताणीचं असतं. मात्र, त्याकडे तारांबळ म्हणून पाहणं चुकीचं आहे. हा एक सुंदर प्रवास आहे आणि तो जगून पाहायला हवं. आई झाल्यानंतर दृष्टिकोन बदलतो. बाळाच्या मानसिक, भावनिक जडणघडणीची जबाबदारी तुमच्यावर असते. सहानुभूती, निःस्वार्थ प्रेम नैसर्गिकरित्या मनात येतं. त्यामुळे जगाकडे आणि छोट्या-मोठ्या गोष्टींकडे संवेदनशीलतेने पाहायला लागतं. मूल होणं किंवा आई होणं हा पूर्णतः वैयक्तिक निर्णय आहेत. हे स्त्रीत्वाचं मोजमाप नाही. राधालाच माझं प्राधान्य राहिलं आणि तिच्या सर्वांगीण विकासालाच मी सर्वांत जास्त महत्त्व दिलं.

(शब्दांकन : आकांक्षा पाटील)

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स...

  • आई होण्याचा निर्णय समाजाच्या अपेक्षेवर न घेता, तुमच्या आंतरिक इच्छेनं घ्या. आई होणं ही एक जबाबदारी आहे, ड्युटी नाही.

  • तुमची स्वतःची ओळख आहे, हे विसरू नका. मुलाला प्राधान्य असलं पाहिजे; पण तुमचं अस्तित्व त्यापलीकडेही आहे.

  • ‘आदर्श आई’च्या संकल्पनेतून बाहेर पडा. आपलं मूल आपल्याला आईपण शिकवतं. पुस्तकातली आई बनण्याचा प्रयत्न करू नका.

  • मुलांसोबत मोकळेपणाने बोला. कामासाठी लांब जावं लागत असेल तरी मुलांशी प्रामाणिक राहा, त्यांना समजवा.

  • मुलांसोबतचा वेळ महत्त्वाचा आहे. पाळणाघरात सोडल्यामुळे अपराधी वाटून घेऊ नका, जेवढा वेळ मिळतो, तो चांगला जगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT