Reduce Belly Fat esakal
लाइफस्टाइल

Reduce Belly Fat : पोटाची चरबी कमी करायचीयं? काकडी आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय

बेली फॅट कमी करण्यासाठी मग विविध प्रकारचे व्यायाम, डाईट फॉलो करण्याचा प्रयत्न अनेक जण करताना दिसतात.

सकाळ डिजिटल टीम

Belly Fat : आजकाल महिला आणि पुरुषांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात किशोरवयीन मुला-मुलींमध्ये याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. फास्टफूड खाण्याची सवय, व्यायामाचा अभाव आणि बिघडलेली जीवनशैली ही यामागची प्रमुख कारणे असू शकतात.

पोटावरील चरबी वाढण्याची समस्या आजकाल मोठे रूप धारण करत आहे. या पोटावरील चरबीमुळे महिला चांगल्याच त्रस्त झाल्या आहेत. हे बेली फॅट कमी करण्यासाठी मग विविध प्रकारचे व्यायाम, डाईट चार्ट फॉलो करण्याचा प्रयत्न अनेक जणी करताना दिसतात.

मात्र, तुम्हाला हे माहित आहे का ? की काही घरगुती उपाय आणि याच्या जोडीला व्यायाम करून तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता. हे घरगुती उपाय नियमित करण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात, बेली फॅट कमी करण्यासाठीचे हे घरगुती उपाय.

१. मध आणि लिंबू

मध आणि लिंबामध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅटीऑक्सिडंट्स असतात. मध आणि लिंबू आपली पचनसंस्था सुरळीत करण्याचे महत्वाचे काम करतात. त्यामुळे, वजन नियंत्रणात आणण्यासाठी हे दोन्ही घटक अतिशय महत्वाचे आहेत.

एक ग्लास गरम पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर, यामध्ये चिमूटभर काळी मिरी घाला. आता हे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.

२. काकडी

काकडी ही सॅलेडमध्ये आपण बरेचदा खातो. आहारामध्ये काकडीचा समावेश असणे हे अतिशय गरजेचे आहे. काकडीमध्ये ९०% पाणी असते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. शिवाय, कोलेस्ट्रॉल अजिबात नसते.

काकडी खाल्ल्याने आपल्या शरिरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत मिळते आणि आपले शरीर ताजेतवाने राहण्यास मदत मिळते आणि तुमची त्वचा ही छान राहते. त्यामुळे, आहारात काकडीचा समावेश अवश्य करा.

३. बडीशेप

बडीशेप आपले वजन नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात बडीशेपचे विशेष महत्व आहे. रोज जेवण झाल्यानंतर आपण बडीशेप खातो. यामागचे कारण, म्हणजे बडीशेप खाल्ल्याने आपले जेवण व्यवस्थित पचते.

अनेकदा आपण अतिशय हेव्ही जेवण करतो. अशावेळी ते अन्न पचण्यास त्रास होण्याची शक्यता असते. मग अशावेळी तुम्ही हे हेव्ही जेवण करण्याआधी साधारण १५-२० मिनिटांपूर्वी बडीशेप घातलेले १ ग्लास गरम पाणी पिऊ शकता. त्यामुळे, हे हेव्ही जेवण केल्यानंतर तुम्हाला जड वाटत नाही.

४. नाश्त्यामध्ये खा टोमॅटो

टोमॅटो हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. टोमॅटोचा वापर आपण हेल्दी ड्रिंक्ससाठी, आहारासाठी, त्वचेसाठी देखील करतो. वजन नियंत्रित करण्यामध्ये टोमॅटो मोठी भूमिका बजावते.

जर तुम्ही रोज सकाळी नाश्त्यामध्ये २ टोमॅटो खाल्ले तर तुम्हाला पुढील २ महिन्यांमध्ये याचा फरक दिसण्यास सुरूवात होईल. यामुळे, तुम्ची त्वचा ही सुंदर होण्यास मदत मिळेल आणि पोटावरील चरबी कमी होऊन तुमचे वजन कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT