nite mobile esakal
लाइफस्टाइल

रात्री मुली मोबाइलवर काय सर्च करतात? चार गोष्टी आहेत फेव्हरेट

गुगलने याबाबत नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आजकाल मोबाईल आणि इंटरनेट प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झाल्या आहेत. सर्व वयोगटातली लोकं यावर पडीक असतात. प्रत्येकजण आपआपल्या आवडीनुसार गोष्टी सर्च (Search) करत असतो. त्यात गुगलवरून (Google) सर्च करण्याचे प्रमाण साहजिकच जास्त आहे. मोबाइल (Mobile) सर्चवरून कोणाला कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ते लक्षात येतं. गुगलने याबाबत एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये तरूण मुली (Women) रात्री एकट्या असताना इंटरनेटवर जास्त काय सर्च करतात, ते सांगितलं आहे. यासाठी गुगलने जो डाटा बेस वापरला आहे त्यात ७५ टक्के महिला १५ ते ४३ वयोगटातील आहेत.

online shopping

या चार गोष्टी बघतात मुली

ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping)

शॉपिंग हा मुलींचा अत्यंत आवडता विषय. नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर ट्रेंड काय आहे, ते बघत विविध शॉपिंग साईट त्या पाहतात. याशिवाय शॉपिंग करायचे नसेल तरीही नवीन काय बाजारात आलंय ते बघण्याकडे त्यांचा कल असतो. अनेक तरूण मुली रात्रीच्या वेळी शॉपिंग साईट्सला भेट देतात. तिथल्या वेगवेगळ्या ऑफर, नविन कलेक्शन, लेटेस्ट ट्रेण्ड्स या गोष्टी त्या इंटरनेटवर शोधतात.

beauty products

ब्युटी टिप्स (Beauty Tips)

अनेक तरूण मुली रात्री इंटरनेटवर ब्यूटी टिप्स विषयी माहिती घेतात. १७ ते ३४ या वयोगटातील बहुतांश मुलींना इंटरनेटवर वेगवेगळे कॉस्मेटिक्स, मेकअप टिप्स, घरगुती सौंदर्योपचार, लेटेस्ट ब्यूटी ट्रेण्ड्स, जगभरातील फॅशन ट्रेण्ड याविषयी माहिती घेण्याची आवड आहे, असे हा अहवाल सांगतो. यात कोरियन ब्युटी ट्रेंड अनेक मुली फॉलो करत असल्याचे दिसते.

Good music is always good for health

गाणी ऐकणे (Lisen Songs)

अनेक मुलींना गाणी ऐकायला खूप आवडतात. दिवसभराच्या व्यस्त कामात ती मनासारखी ऐकता येत नाहीत. अशा वेळी अनेकजणी रात्रीच्या वेळी इंटरनेटवर गाणी सर्च करण्याला प्राधान्य देतात. अनेकींना शांत वाटेल अशी गाणी ऐकत झोपण्याची सवय असते. त्यामुळे रात्री साधारण त्याच धाटणीची हलकी-फुलकी रोमॅंटिक गाणी जास्त शोधली जातात.

Education

करिअर, विविध अभ्यास (Carrier)

करिअरबाबत मुली आता खूप सजग झाल्या आहेत. कुठल्या करिअरमध्ये चांगल्या संधी आहेत, याची त्यांना माहिती हवी असते. सध्या हटके करिअऱच्या विविध आणि भरपूर संधी आहेत. म्हणूनच आपल्या क्षेत्रातील करिअरच्या वेगवेगळ्या संधी शोधण्याचा प्रयत्न अनेक तरूणी इंटरनेटच्या माध्यमातून करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT