5 Questions Emotionally Intelligent People Don’t Ask Sakal
लाइफस्टाइल

बुद्धिमान लोक हे ५ प्रश्न कधीच कुणाला विचारत नाहीत

Intelligent People: तुमचा प्रश्न स्वतःला असुरक्षित किंवा कमकुवत समजणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात चिंता निर्माण करू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

ख्रिसमस जवळ आला आहे, आणि आपल्यापैकी बहुतेक जण मित्र आणि कुटुंबासह सुट्टी घालवण्यास उत्सुक असतील. परंतु आपल्यापैकी अनेकांसाठी हा काळ थोडासा त्रासदायक असू शकतो. एखादा स्वतःला असुरक्षित किंवा कमकुवत समजत असेल तर त्याचा हा विचार त्याच्या आयुष्यात चिंता निर्माण करू शकतो. अशावेळी लोकांचे प्रश्न त्यांना अजून अस्वस्थ करू शकतात. आज आपण अशा पाच प्रश्नांची चर्चा करणार आहोत, जे प्रश्न भावनिकदृष्ट्या बुद्धिमान (Intelligent) लोक कुणालाही विचारत नाहीत. ( These 5 Questions Emotionally Intelligent People Don’t Ask)

1. तुमचे वजन वाढले/कमी झाले का? (Have you gained/ lost weight?)-

जर तुम्हाला एखाद्याच्या दिसण्यावर त्‍याच्‍या वजनाच्‍या दृष्‍टीने टिप्‍पणी करायची असेल तर तुम्‍ही तसं करू नये, कारण बोलण्‍यासाठी अनेक चांगल्या गोष्टी आहेत. तथापि, जर तुम्हाला त्यांच्या आरोग्याविषयी चिंता असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवायला हवं की, एखाद्या व्यक्तीचे वजन असंख्य घटकांवर अवलंबून असते आणि त्यामध्ये काही दिवसात खूप चढ उतार होऊ शकतात. निर्जलीकरण, पचन, आतड्याचे कार्य तसेच आजार आणि हार्मोनल परिस्थितींवर देखील ते अवलंबून असते. ज्यामुळे लोक पूर्णपणे असहाय्य बनतात. बुद्धिमान लोकांना हे माहिती असत की लोक कसे दिसतात यावर त्यांचे नियंत्रण नसतं. त्यामुळे याबाबतीत ते कुणालाही प्रश्न विचारत नाहीत. असे प्रश्न विचारण्याऐवजी त्यांच्याशी अधिक चांगल्या गोष्टींबद्दल बोला ज्यामुळे त्यांचा स्वाभिमान वाढेल. (Here are five questions that emotionally intelligent people do not ask.)

2. तुम्ही किती पैसे कमवता? (How much money are you making these days?)-

हा प्रश्न अनेकांना आवडत नाही. पैसा कमावण्याबाबत बहुतेक लोकांची मते भिन्न असतात. जरी तुम्ही त्यांना त्यांच्या प्रगतीबद्दल शुद्ध हेतूने विचारत असाल, तरीही ते किती कमावत आहेत हे एखाद्याला विचारणे उचित नाही.

3. तुम्ही मुलांचा विचार कधी करणार? (When do you plan to have kids?)-

ही एक अत्यंत खाजगी बाब आहे ज्यासाठी कोणाच्याही मतांची किंवा चौकशीची आवश्यकता नाही. हा एका जोडप्याचा निर्णय आहे आणि तो परस्पर संमती, वय, आरोग्य परिस्थिती आणि आर्थिक यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो. जोडप्याला त्यांच्या कुटुंब नियोजनाबद्दल विचारणं टाळावं.

4. तुम्ही डेटिंग/विवाहित का नाही? (Why aren’t you dating/married?)-

भावनिकदृष्ट्या हुशार लोक हे सत्य मान्य करतात की लोकांची टाइमलाइन भिन्न असते आणि त्यांचे जीवन भिन्न असते जे नेहमी त्यांच्या गोष्टी करण्याच्या हेतूंशी जुळत नाही. त्याऐवजी, त्यांना विचारा, ‘तुम्ही अलीकडे नवीन मैत्री प्रस्थापित केली आहे का?’ किंवा तुमचे नाते कसे चालले आहेत?'

5. तुम्हाला नोकरी कधी मिळणार? (When are you getting a real job?)-

हा प्रश्न अनेकांना दुखावतो. एखाद्याने आयुष्यात किती यश मिळवलं किंवा ते नोकरी कधी करणार हा प्रश्न अतिशय असंवेदनशील आहे. त्यामुळे पुढच्याच्या भावना दुखावतात. हा प्रश्न विचारल्याने तुम्ही पुढची व्यक्ती तुम्हाला असभ्य समजतात. जर तुम्हाला त्यांच्या करिअरच्या योजनांबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर असे प्रश्न विचारा ज्याच्यामुळे पुढची व्यक्ती अस्वस्थ होणार नाही जसे की, तुम्ही कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहात? किंवा मग मला तुमच्या कामाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT