these are some effective tips for removing beard dandruff Marathi article 
लाइफस्टाइल

दाढीतील कोंडा घालवण्यासाठी या टिप्स ठरतील प्रभावी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : केसामध्ये कोंडा होणे ही समस्या फक्त डोक्यामधील केसांसाठीत नाही तर तो आयब्रोज, आयलिड्स तसेच दाढीमध्ये देखील होऊ शकतो. तुमच्या दाढीत जर कोंडा झाला असेल तर तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाच्या ते लक्षात येईल आणि तुमचे इंप्रेशन खराब पडेल. तसेच यामुळे केसांच्या वाढीवर देखील परिणाम होतो.

दाढीतील कोंड्याची समस्या ही  त्याच्याबरोबर खाज सुटणे आणि मुरुमांसारख्या इतर अनेक समस्या घेऊन येते. ज्याचा एकच इलाज आहे तो म्हणजे क्लीन शेव करणे. पण जर तुम्हाला तुमची दाढी खूपच आवडत असेल तर ते तुमच्यासाठी अवघड ठरु शकते. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याचा अवलंब केल्याने तुम्ही दाढीतील कोंडापासून मुक्त होऊ शकता. हे उपाय करणे सोपे आहे आणि ते स्वतःहून करणे शक्य आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊया. 

1. ट्रिमिंग करा

दाढीमध्ये कोंडा होण्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता आणि वेळेवर ट्रिम न करणे ही आहेत. तुम्हाला स्वतःचा बियर्ड लुक आवडत असेल परंतु दाढीतील कोंडा टाळण्यासाठी त्याचे ट्रिमिंग देखील वेळोवेळी करणे तेवढेच आवश्यक आहे. वेळेवर ट्रिमिंग केल्याने केसांमध्ये कोंडा तयार करणारे जीवाणू जीवंत राहू शकत नाहीत. 

2. दाढीला देखील मॉइश्चराईज करा

आपल्या चेहऱ्यावर दाढी असल्यामुळे आपण तेथे मॉइश्चरायझर लावला नसेल तर असे करू नका. दाढीच्यामध्ये देखील व्यवस्थित मॉइश्चरायझर लावा. ज्यामुळे तेथे त्वचा कोरडे होणार नाही आणि कोंडाची समस्या दूर होईल. 

3. हर्बल साबण वापरा

आंघोळीचे साबण हे बऱ्याचदा त्वचा कोरडे करतात, ज्यामुळे कोंडा होऊ शकतो. म्हणून, शरीराबरोबरच दाढीवर हर्बल उत्पादने वापरणे चांगले ठरेल. बऱ्याचदा साबणांच्या बाबतीत लोक दुर्लक्ष करतात, त्यामुळे तुम्ही साबण निवडताना काळजी घ्या. तसेच दाढी धुण्यासाठी नेहमीच थंड पाण्याचा वापर करा.
फॅशन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT