Shardiya Navratri 2024 Sakal
लाइफस्टाइल

Shardiya Navratri 2024: नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताय? मग जाणून घ्या नियम, आयुष्यात मिळेल यश

पुजा बोनकिले

Shardiya Navratri 2024: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे. यंदा शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात. नवरात्रीततुम्ही अखंड दिवा लावत असाल तर पुढील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

अखंड दिवा लावण्याचे नियम

नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते. नऊ दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत म्हणतात. त्याचबरोबर ही ज्योत विझवणे अशुभ मानले जाते. अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळली की ती पुन्हा वाटता येत नाही. नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते. तसेच माता देवीचा कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते. अखंड दिवा प्रज्वलित केल्याने मनोकामना पूर्ण होतात असाही समज आहे.

  • जर काही कारणाने अखंड दिवा विझत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा-पुन्हा विझत असेल, तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही.

  • दिवा पुन्हा पुन्हा विझणे अशुभ मानला जातो. परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही, जर अखंड दिवा विझत असेल तर माता देवीची क्षमा मागावी.

  • शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विझला तर त्यात पुन्हा वात टाकू नका. अखंड दिवा लावताना वात मोठी ठेवावी.

  • नवरात्रात अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस राहीला पाहिजे. शास्त्रानुसार शुभ मानले जाते.

  • नऊ दिवस आणि नवरात्र संपल्यानंतरही दिवा सतत जळत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विझवू नका. त्यापेक्षा दिवा आपोआप विझू द्या.

  • अखंड दिव्यात वात महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आधीच लांब आणि मोठी वात बनवून ठेवावी.

  • ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो,तेथे नकारात्मकता राहत नाही अशी मान्यता आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समृद्धी कायम राहते.

  • अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो.

  • गाईच्या तुपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील वातावरण जंतूमुक्त होतात आणि नकारात्मकता दूर राहते. तसेच घरातील वातावरण शुद्ध राहते.

  • तसेच मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावल्यास घरात सुख-समृद्धी येते. तसेच पितर शांत राहतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : विधानसभा तोंडावर असताना निवडणूक आयोगाची राज्य शासनावर नाराजी; मुख्य सचिवांना लिहिलं पत्र

Mumbai University Senate Election Result: सिनेट निवडणुकीत युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी, खुल्या वर्गातील उमेदवारांची मतमोजणी सुरू

Param Rudra Supercomputers : PM मोदींनी लॉन्च केलेले सुपर कॉम्प्युटर्स का आहेत खास? जाणून घ्या सर्वकाही

Health Department Scam: स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्य विभागाचा 3,200 कोटींचा घोटाळा? वडेट्टीवारांनी सादर केली कागदपत्रं

Kamindu Mendis ने मोडला कांबळीचा २० वर्षे जुना विक्रम! 'असा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई, तर ब्रॅडमन यांच्याशीही बरोबरी

SCROLL FOR NEXT