Jojoba Oil For Skin : हवेतील प्रदूषण आणि वातावरणातील बदलांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. मात्र, यासोबतच याचा आपल्या त्वचेवर ही परिणाम होतो. प्रदूषण आणि धुळीमुळे चेहऱ्याची त्वचा खराब होऊ लागते. त्वचा खराब झाली की, मग त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागतात.
मग, त्वचेवर पुरळ-पिंपल्स येणे, मुरूम येणे आणि चेहऱ्यावर डाग येणे इत्यादी समस्या सुरू होतात. या सर्व समस्या सुरू झाल्या की मग आपली चिडचिड होते. या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या क्रीम्स, केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करतो. मात्र, म्हणावा तसा फरक काही दिसत नाही.
या समस्या दूर करण्यासाठी आपण काही नैसर्गिक तेलांची ही मदत घेऊ शकतो. आजकाल जोजोबा तेल हे खूपच लोकप्रिय झाले आहे. हे तेल चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी अतिशय लाभदायी आहे.
हे तेल जोजोबा नावाच्या वनस्पतीपासून काढले जाते. हे तेल अमेरिकेतून भारतात आले आहे. या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्सचा समावेश आढळून येतो. आज आपण या तेलाचे त्वचेला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.
जोजोबा तेलामध्ये व्हिटॅमिन ई चे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, हे तेल त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे, त्वचेतील घाण आणि धूळ स्वच्छ होण्यास मदत होते. या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे, पिंपल्सच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. (Cleanses the skin)
या तेलाचे काही थेंब तुम्ही चेहऱ्यावर लावून काही मिनिटे मसाज करू शकता. रात्री झोपताना शक्यतो हे तेल चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे मसाज करा. त्यानंतर, कॉटनच्या सहाय्याने चेहरा पुसून घ्या किंवा रात्रभर तेल चेहऱ्यामध्ये मुरू द्या. सकाळी उठल्यानंतर चेहरा साफ करा.
जोजोबा तेलामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुणांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, या तेलाचा वापर केल्याने सनबर्नची समस्या देखील दूर होण्यास मदत होऊ शकते. (Get rid of sunburn)
या तेलाचा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी जोजोबा तेलाचे काही थेंब पिणे देखील फायदेशीर आहे. सनबर्नसाठी हा एक प्रभावी उपाय म्हणून काम करू शकते. या तेलामध्ये त्वचेतील जळजळ कमी करण्याची आणि त्वचेतील पेशींच्या निर्मितीची गती वाढवण्याची प्रभावी क्षमता आहे. त्यामुळे, या तेलाचे काही थेंब त्वचेवर लावून मसाज केल्याने त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.