Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी 'या' गोष्टीचा करा वापर, केसांना मिळतील फायदे

थंडीच्या दिवसांमध्ये केस कोरडे होण्याचा धोका अधिक असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : देशात सर्वत्र आता कडाक्याच्या थंडीला सुरूवात झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आपण त्वचेची आणि आरोग्याची खास काळजी घेतो. मात्र, या दिवसांमध्ये केसांची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण, थंडीच्या दिवसांमध्ये केस अधिक कोरडे होण्याचा धोका असतो.

थंडीच्या दिवसांमध्ये आपण त्वचेला मॉईश्चर मिळावे यासाठी व्हॅसलिन पेट्रोलिअम जेलीचा वापर करतो. या पेट्रोलिअम जेलीमध्ये मिनरल ऑईल्स, नैसर्गिक मेण यांचा समावेश आढळून येतो.

परंतु, त्वचेसोबतच व्हॅसलिन हे केसांसाठी देखील फायदेशीर आहे. व्हॅसलिनमध्ये मॉईश्चरला लॉक करणारे गुणधर्म असल्यामुळे हे त्वचेसोबतच केसांसाठी देखील फायदेशीर ठरते. त्यामुळे, खास हिवाळ्यात तुमच्या हेअरकेअर रूटीनमध्ये तुम्ही व्हॅसलिनचा समावेश करू शकता.

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा वापर कसा करू शकता? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

केसांना मिळते डिप कंडिशनिंग

थंडीच्या दिवसांमध्ये केस कोरडे होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये केसांना योग्य पोषण देणे गरजेचे असते. या कामी तुम्ही व्हॅसलिनची मदत घेऊ शकता.

व्हॅसलिनच्या मदतीने तुम्ही केसांचे छान डिप कंडिशनिंग करू शकता. यासाठी केस आधी थोड्या प्रमाणात ओलसर करून घ्या. त्यानंतर, हातावर थोडसं व्हॅसलिन घेऊन ते स्काल्पवर (टाळूवर) आणि केसांना लावा.

त्यानंतर, ३० मिनिटे केस असेच राहूद्या. त्यानंतर, हे व्हॅसलिन काढून टाकण्यासाठी केसांना शॅंम्पू लावा आणि नंतर कंडिशनर लावा.

हेअर मास्क बूस्टरप्रमाणे करेल काम

थंडीच्या दिवसांमध्ये केसांना चांगल्या प्रकारे हायड्रेट ठेवण्यासाठी आपण हेअर मास्कचा वापर करतो. हेअर मास्कमुळे केसांना छान पोषण मिळते आणि केस हायड्रेट राहण्यास मदत होते.

मात्र, व्हॅसलिनचा वापर देखील तुम्ही हेअर मास्कप्रमाणे करू शकता. व्हॅसलिन हे हेअर मास्क बूस्टरप्रमाणे केसांवर काम करते. यासाठी फक्त हेअर मास्कमध्ये काही प्रमाणात व्हॅसलिन मिसळा. त्यानंतर, ही पेस्ट केसांवर लावा. साधारण ३० मिनिटांनंतर केस धुवून टाका.

केसांचा फ्रिझीनेसपणा करते कंट्रोल

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेसोबतच केस देखील कोरडे होतात. केस कोरडे झाल्यामुळे ते रूक्ष आणि निस्तेज दिसू लागतात. यामुळे, केसगळतीचे प्रमाण देखील वाढते. केस कोरडे होण्यासोबतच त्यातील फ्रिझीनेसपणा देखील वाढतो. त्यामुळे, केस तुटण्याची समस्या निर्माण होते.

अशा परिस्थितीमध्ये केसांचा फ्रिझीनेसपणा कंट्रोल करण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनची मदत घेऊ शकता. हातांवर काही प्रमाणात व्हॅसलिन घ्या, ते तळहातांवर चोळून घ्या. त्यानंतर, तुमच्या केसांवर हलक्या हाताने व्हॅसलिन लावा. यामुळे, तुमचे केस मऊ होतील आणि केसांचा फ्रिझीनेसपणा कमी होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT