Christmas 2023 esakal
लाइफस्टाइल

Christmas 2023 : यंदाच्या ख्रिसमस पार्टीला असा करा मेकअप लूक, दिसाल आकर्षक

अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Christmas 2023 : अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. सध्या सर्वत्र ख्रिसमसची लगबग पहायला मिळत आहे. मार्केटमध्ये ख्रिसमस ट्रीच्या सजावटीचे साहित्य, सांताक्लॉजच्य टोप्या, जिंगल बेल्स, केक्स आणि विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल पहायला मिळत आहे.

ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक जण पार्टीचे आयोजन करतात. मग, या पार्टीसाठी खास थीम ठरवली जाते. या पार्टीला जाण्यासाठी तरूणी खास तयारी करण्यावर भर देतात. आऊटफीटसोबत मेकअपची देखील क्रेझ असते.

या पार्टीला जाण्यासाठी मेकअप कसा करावा? असा प्रश्न महिलांना नेहमीच पडतो. मात्र, तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला खास ख्रिसमस पार्टीसाठी मेकअपच्या काही टिप्स देणार आहोत. कोणत्या आहेत त्या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

ग्लॅम मेकअप लूक

पार्टीसाठी नेहमीच ग्लॅमरस मेकअप लूकला पसंती दिली जाते. हा मेकअप करताना तुम्हाला ग्लॉसी टच द्यावा लागतो. यासाठी तुम्ही जे मेकअप प्रॉडक्ट्स वापरता तेच वापरायचे आहेत फक्त त्यात जरा ब्राऊन कलर अ‍ॅड करायचा आहे. (Glam makeup look)

glam makeup look

आयशॅडोज किंवा गालांवर तुम्ही ब्राऊन ब्लशचा वापर करू शकता. यामुळे, तुमच्या मेकअप लूकला एक वेगळाच ग्लॅम लूक मिळू शकेल. आजकाल असे मेकअप लूक्स खूप ट्रेंडमध्ये आहे. ओठांवरत तुम्ही बोल्ड लिपस्टिकचा वापर करू शकता जेणेकरून तुम्ही ख्रिसमस पार्टीमध्ये उठून दिसाल.

रेड बोल्ड मेकअप लूक

हा रेड बोल्ड मेकअप लूक ख्रिसमस पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे. हा मेकअप लूक खास करून रेड, व्हाईट आणि ब्लॅक आऊटफीटवर उठून दिसतो. त्यामुळे, खास ख्रिसमस पार्टीसाठी हा रेड बोल्ड मेकअप लूक हमखास केला जातो. (Red bold makeup look)

red bold makeup look

हा मेकअप करताना तुम्हाला तुमचा मेकअप बेस फक्त नॉर्मल ठेवायचा आहे. फक्त तुम्हाला स्मोकी आयमेकअप करायचा आहे, आणि रेड लिप कलरचा वापर करून ओठांना बोल्ड टच द्यायचा आहे. रेड कलरमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या लिप शेड्सचा वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT