Dal Rice Benefits esakal
लाइफस्टाइल

Dal Rice : दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात वरणभात खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

वरणभात हा पदार्थ पचायला हलका आणि तितकाच पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. हा वरणभात अनेक जण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात आवर्जून खातात. हा हलका आहार घेतल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Dal Rice Benefits : देशातील प्रत्येक राज्यातील खाद्यसंस्कृती जरी वेगळी असली तरी डाळ-भात किंवा वरणभात हा पदार्थ कुणाला माहित नाही, असे होऊच शकत नाही. आपल्या देशात क्वचितच कोणी असेल की ज्याने अजूनपर्यंत वरणभात खाल्ला नसेल. आपल्या भारतात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यापैकी एक असलेला हा वरणभात लोक आवडीने खातात.

वरणभात हा पदार्थ पचायला हलका आणि तितकाच पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. हा वरणभात अनेक जण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात आवर्जून खातात. हा हलका आहार घेतल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

वरणाच्या डाळींमध्ये आणि भातामध्ये हेल्दी फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स, प्रोटिन्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन्स इत्यादी पोषकघटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. आज आपण वरणभात खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

हृदयासाठी फायदेशीर

काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात वरणभाताचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित असलेले आजार होण्याची शक्यता कमी होते. यासोबतच हा पचायला हलका आणि पौष्टिक असलेला आहार आपला मूड चांगला ठेवण्यास मदत करते. ज्या लोकांना फिट रहायचे आहे, अशा लोकांनी रात्रीच्या जेवणात वरणभाताचा जरूर समावेश करावा.

हाडांना मिळते मजबूती

तांदूळ आणि डाळींमध्ये प्रथिने आणि कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. या पोषकघटकांमुळे शरीरातील मांसपेशींना आणि हाडांना मजबूती मिळते. वरणभातातील या पोषकघटकांमुळे दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शक्यतो वरणभात खाताना त्यात डाळींचे प्रमाण अधिक असणे, हे फार महत्वाचे आहे.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

वजन कमी करण्यासाठी डाळी आणि कडधान्ये फायदेशीर मानली जातात. कारण, डाळी आणि कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, वरणभात खाल्ल्यानंतर तुम्हाला इतर खाद्यपदार्था खाण्याची क्रेव्हिंग होत नाही. शिवाय, पोट भरलेले राहते त्यामुळे, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

वरणभातामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे, पोटाच्या समस्या जसे की, गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. शिवाय, वरणभातामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे? अशा लोकांनी त्यांच्या आहारात वरणभाताचा जरूर समावेश करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT