Green Beans Benefits esakal
लाइफस्टाइल

Green Beans Benefits : अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी लाभदायी आहे फरसबी, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

फरसबीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो.

Monika Lonkar –Kumbhar

Green Beans Benefits : निरोगी जीवनशैलीसाठी योग्य आहार आणि व्यायाम यांची जोड असणे अतिशय महत्वाचे आहे. आहारामध्ये आपण काय खातो? आणि किती प्रमाणात खातो? याला फार महत्व आहे. हिरव्या भाज्यांमध्ये लाभदायी असणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी फरसबी ही आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे.

फरसबीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये फरसबीचा आवर्जून वापर केला जातो. ज्यामुळे, पदार्थाची चव आणखी वाढते. मोठ्यांसोबतच लहान मुले देखील ही फरसबीची भाजी आवडीने खातात.

ही फरसबी आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाची आहे. फरसबीमध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. चला तर मग, जाणून घेऊयात फरसबीचे आपल्या शरीराला होणारे फायदे कोणते?

पचनसंस्था सुरळीत राहते

फरसबीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्सचा समावेश आढळून येतो. त्यामुळ, फरसबीचे सेवन केल्याने आपली पचनसंस्था संतुलित आणि निरोगी राहण्यास मदत होते. फरसबीचे सेवन केल्याने पोटाच्या इतर समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे, आहारात फरसबीचा जरूर समावेश करावा.

हाडांना मिळते बळकटी

फरसबीमध्ये व्हिटॅमिन्सचे मुबलक प्रमाण आढळून येते. फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि कॅल्शिअमचा समृद्ध स्त्रोत फरसबीमध्ये आढळून येतो. त्यामुळे, फरसबीमधील या पोषकघटकांमुळे आपल्या शरीराची हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. हाडांना बळकटी मिळाल्यामुळे, फ्रॅक्चरचा धोका देखील कमी होतो.

अ‍ॅनिमियामध्ये प्रभावी आहे फरसबी

फरसबीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटक आढळून येतात. या पोषकघटकांमध्ये लोहाचे ही विपुल प्रमाण आढळून येते. लोह हा आपल्या शरीरातील रक्तपेशींचा एक महत्वाचा आणि अत्यावश्यक भाग आहे. या लोहामुळे शरीरातील इतर सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत होते.

त्यामुळे, आहारातील लोहाचे अपुरे सेवन झाले की, अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणे इत्यादी समस्या निर्माण होतात. त्यामुळे, फरसबीचा आहारात जरूर समावेश करावा. शरीरात पुरेशा प्रमाणात लोह असल्याने अ‍ॅनिमियापासून बचाव केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT