Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : हिवाळ्यात खायलाच हवा हरभरा, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात बाजारात अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि विविध प्रकारची फळे उपलब्ध असतात. त्यामुळे, या दिवसांमध्ये जेवणात विविध खाद्यपदार्थांची चंगळ असते.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : हिवाळ्यात बाजारात अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि विविध प्रकारची फळे उपलब्ध असतात. त्यामुळे, या ऋतुमध्ये जेवणामध्ये विविध खाद्यपदार्थांची चंगळ असते. विविध खाद्यपदार्थ देखील या दिवसांमध्ये खास करून बनवले जातात. थंडीमुळे अनेक जण या दिवसांमध्ये आजारी पडतात.

मात्र, काही हिरव्या पालेभाज्यांचा आणि फळांचा तुम्ही आहारात समावेश केला तर आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. या हिरव्या पालेभाज्यांपैकी एक असलेली भाजी म्हणजे हिरवा हरभरा होय.

या हरभऱ्यामध्ये जीवनसत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, आपल्या आरोग्यासाठी हा हरभरा अतिशय फायदेशीर आहे. आज आपण हरभऱ्याचे आरोग्याला होणारे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते

हरभऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर्सचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, जेव्हा आपण हरभऱ्याचे सेवन करतो, तेव्हा आपले पोट भरलेले राहते. पोट भरलेले राहिल्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे, वजन नियंत्रणात ठेवले जाते. हरभऱ्याचे सेवन केल्याने आपली पचनसंस्था सुरळीत राहण्यास मदत होते.

शरीराला मिळते ऊर्जा

हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन-बी ९ म्हणजेच फॉलेटचे अधिक प्रमाण आढळून येते. त्यामुळे, हरभऱ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. आहारात हरभऱ्याचा समावेश तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. पराठा आणि भाजीच्या स्वरूपात किंवा तसेच हरभरे ही तुम्ही खाऊ शकता. हरभऱ्याचा वापर करून तुम्ही सॅलेड आणि चाट ही बनवू शकता.

मांसपेशींना मिळते मजबूती

हरभऱ्यांमध्ये प्रथिनांचे भरपूर प्रमाण आढळून येते. जे लोक शाकाहारी आहेत, त्यांनी त्यांच्या आहारात हरभऱ्याचा जरूर समावेश करावा, कारण, प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून हरभऱ्याला ओळखले जाते. शाकाहारी लोकांना जर शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर करायची असेल तर त्यांनी आहारात हरभऱ्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

शिवाय, हरभऱ्यांचे सेवन केल्याने शरीरातील मांसपेशींच्या विकासाला चालना मिळते. तसेच, मांसपेशी मजबूत होण्यास मदत मिळते. त्यामुळे, आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या हरभऱ्याचा आहारात जरूर समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT