Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे लव्हेंडर टी, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका पडला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. थंडी सुरू झाली की, अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. खास करून सर्दी, ताप-खोकला इत्यादी समस्यांची त्यात आणखी भर पडते.

शिवाय, हिवाळ्यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी झालेली असते. त्यामुळे, या संसर्गजन्य आजारांना आपण लगेच बळी पडतो. मात्र, या दिवसांमध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लव्हेंडर टी हा फायदेशीर आहे.

हिवाळ्यात हा लव्हेंडर चहा प्यायल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबत अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

चांगली झोप येते

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांच्या झोपेचे वेळापत्रक जणून कोलमडले आहे. अपुरी झोप झाली की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, चांगल्या झोपेसाठी तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी लव्हेंडर चहा बनवून प्यायला तर तुम्हाला चांगली झोप येईल. यासोबतच जास्त थंडी देखील वाजणार नाही. चांगल्या झोपेसाठी हा चहा अवश्य प्या.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

लव्हेंडर चहा प्यायल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासोबतच हा चहा प्यायल्याने आपले शरीर फ्रेश आणि तंदूरूस्त राहण्यास मदत होते. त्यामुळे, हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा चहा नक्की बनवा आणि प्या.

फ्लूपासून बचाव होतो

हिवाळ्यात आपल्या शरीराला अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. शिवाय, या दिवसांमध्ये आपल्या सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे, अनेक संसर्गजन्य आजारांना आपण बळी पडतो.

जसे की, सर्दी-ताप आणि खोकल्यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी लव्हेंडर टी हा अतिशय फायदेशीर आहे. हा चहा जादूप्रमाणे काम करतो आणि या आजारांपासून आपली सुटका करण्यास मदत करतो. त्यामुळे, या थंडीच्या दिवसांमध्ये लव्हेंडर चहा प्यायला अजिबात विसरू नका.

बॉडी डिटॉक्ससाठी लाभदायी

आपले शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा लव्हेंडर टी उपयुक्त आहे. या दिवसांमध्ये हा चहा नियमितपणे प्यायल्याने आपल्या शरीराची पचनक्षमता देखील सुरळीत राहते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT