Hair Falls : लांब आणि घनदाट केस असावेत, असे प्रत्येक महिलेला वाटते. मात्र, आजकालचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमध्ये केसांचा ही समावेश आहे.
केसांना योग्य पोषण मिळणे देखील गरजेचे असते, ते जर मिळाले नाही तर मग केस गळणे, केसांमध्ये फाटे फुटणे, केस अकाली पांढरे होणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, या केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही चांगला आहार घेणे देखील गरजेचे आहे.
केसगळतीच्या समस्येने तर सर्वजण त्रस्त आहेत. मात्र, हे केस का गळतात? यामागील कारणे शोधण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही. मात्र, तुम्ही चिंता करण्याचे कारण नाही. कारण, आज आम्ही केस गळती होण्यामागची प्रमुख कारणे तुम्हाला सांगणार आहोत.
आजकाल केसांच्या हेअरस्टाईल्स करण्यासाठी विविध प्रकारच्या केमिकल्सचा आणि केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे, केस तात्पुरते जरी छान दिसत असले तरी देखील याचा केसांवर विपरीत परिणाम होतो.
मात्र, या केमिकल्समध्ये असलेल्या हानिकारक घटकांमुळे केसांचे नुकसान होते. त्यामुळे, जास्त हार्श केमिकल्स असलेल्या प्रॉडक्ट्सचा वापर करणे टाळा.
तुमचा संतुलित आहार हा जितका आरोग्यासाठी फायदेशीर असतो, तितकाच तो तुमच्या केसांसाठी देखील फायदेशीर ठरतो. त्यामुळे, संतुलित आहार घ्या आणि केसांच्या समस्या दूर करा.
जर तुम्ही संतुलित आहार घेतला नाही तर केसांना योग्य पोषण मिळणार नाही आणि मग केस गळतीच्या समस्या सुरू होतील. त्यामुळे, तुमच्या आहारात नेहमी व्हिटॅमिन ई, डी, लोह, झिंक आणि प्रथिनांनी युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करायला विसरू नका.
जर आपल्या शरीरात अचानक harmonal changes किंवा हार्मोन्समध्ये बदल झाले की, याचा परिणाम केसांवर होतो आणि केस गळायला लागतात. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्हाला केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, हार्मोन्समध्ये बदल होणे हे केसगळतीमागचे प्रमुख कारण आहे.
काही औषधांच्या सेवनामुळे देखील केसगळती होऊ शकते. कर्करोग, संधिवात, नैराश्य, हृदयविकार, उच्च रक्तदाब इत्यादी समस्यांवरील औषधांचे सेवन केल्याने केस गळतीची समस्या वाढू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.