Thyroid Control Tips : बदललेली जीवनशैली आणि असंतुलित आहार इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. थायरॉईड ही अशीच एक समस्या आहे जी दिवसेंदिवस महिलांमध्ये वाढत चालली आहे.
संधोधनानुसार, मागील १० वर्षांमध्ये थायरॉईडच्या रूग्णांची संख्या जगभरात अनेक पटींनी वाढली आहे. ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये आणि तरूणींमध्ये ही समस्या झपाट्याने वाढत चालली आहे.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेली जीवनशैली इत्यादी अनेक कारणांमुळे ही समस्या वाढली असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपल्या शरीरात आढळून येणाऱ्या थायरॉईड ग्रंथींचे कार्य कमी झाल्यामुळे थायरॉईडची समस्या निर्माण होते.
त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टीप्सची मदत घेऊ शकता. कोणत्या आहेत त्या टीप्स? चला तर मग जाणून घेऊयात.
थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी आपण नारळाच्या तेलाचा ही वापर करू शकतो. त्यासाठी, सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी कोमट दूधामध्ये १-२ चमचे नारळाचे तेल मिसळून ते दूध प्यावे.
काही डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. कोरफड आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय बहुगुणी आहे.
थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कोरफडीचे सेवन करू शकता. शरीरातील वात आणि कफ या दोन्हींचा समतोल राखण्याचे काम कोरफड करते. त्यामुळे, शरीरात थायरॉईडची समस्या निर्माण होत नाही.
थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी धणे आणि जिरे अतिशय लाभदायी आहे. धने आणि जिरे एकत्र घेतल्यामुळे त्याचे आश्चर्यकारक फायदे दिसून येतात. हा उपाय करण्यासाठी रात्रभर धने आणि जिरे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर, सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्या. त्यामुळे, थायरॉईडवर नियंत्रित करण्यास मदत होते.
औषधी वनस्पती म्हणून तुळशीला खास करून ओळखले जाते. आयुर्वेदामध्ये तुळशीचे खास महत्व सांगण्यात आले आहे. आपल्या आरोग्यासाठी तुळस अतिशय फायदेशीर आहे.
थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही तुळशीची मदत घेऊ शकता. त्यासाठी, एक कप कोमट पाण्यात तुम्ही तुळशीची पाने उकळून घ्या. त्यानंतर, हे पाणी गाळून प्या. तसेच, रिकाम्या पोटी देखील तुम्ही तुळशीची पाने खाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.