Cardio Exercises esakal
लाइफस्टाइल

Cardio Exercises : कोणत्याही उपकरणांशिवाय घरच्या घरी करा कार्डिओ एक्सरसाईज, ताकद वाढण्यास होईल मदत

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बिघडलेला आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. या परिस्थितीमध्ये आपण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे, महत्वाचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Cardio Exercises : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बिघडलेला आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. या परिस्थितीमध्ये आपण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे, महत्वाचे आहे. संतुलित आहारासोबत आपण नियमितपणे व्यायाम करणे, देखील गरजेचे आहे.

सकाळच्या मॉर्निंग रूटीनची सुरूवात तुम्ही वर्कआऊट सेशनने करायला हवी. यासाठी तुम्ही काही कार्डिओ एक्सरसाईज देखील करू शकता. अनेकांना हा व्यायाम प्रकार करायला आवडतो. श्वासोच्छवासाची गती आणि हृदयाची गती वाढवण्यासाठी तुम्ही कार्डिओ एक्सरसाईज करायला काही हरकत नाही.

यामुळे, तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होईल आणि दिवसभर तुम्ही उत्साही राहाल. आज आम्ही तुम्हाला कोणत्याही उपकरणांशिवाय घरच्या घरी करता येणाऱ्या काही सोप्या कार्डिओ एक्सरसाईजबद्दल सांगणार आहोत.

स्क्वॅट जम्प

  • हा एक्सरसाईज करताना तुमचे पाय खांद्याच्या रूंदीला वेगळे राहतील या स्थितीमध्ये उभे रहा.

  • आता तुम्ही ज्या प्रमाणे जोर बैठका मारता, त्याप्रमाणे खाली वाका आणि मांड्यावर जोर देण्याचा प्रयत्न करा.

  • त्यानंतर, तुमचे गुडघे वाकवा आणि हळूहळू स्क्वॅट स्थितीमध्ये परत या.

लंज जम्प

  • हा व्यायाम प्रकार करताना सरळ रेषेत उभे रहा.

  • आता तुमचा डावा पाय मागे न्या आणि खाली स्क्वॅटच्या स्थितीमध्ये या. या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही गुडघे ९० अंशामध्ये वाकवा.

  • आता तुमचा उजवा गुडघा पुढे आणा आणि ताठ रहा. आता दोन्ही हात एकमेकांमध्ये जोडून घ्या.

  • आता तुमच्या डाव्या पायाची टाच उचलण्याचा प्रयत्न करा.

  • हा व्यायाम प्रकार याच प्रकारे आता उजव्या पायाने करा.

  • हा व्यायाम प्रकार नियमितपणे करण्याचा प्रयत्न करा. रोज किमान २५ ते ३० लंज जम्प मारण्याचा प्रयत्न करा.

  • हळूहळू सुरूवात करा आधी ५ किंवा १० मारण्याचा सराव करा. त्यानंतर, याची संख्या वाढवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT