डोळ्यांचा मेकअप हा जितका आकर्षक असतो, तितका त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर एक वेगळा प्रभाव पडतो. त्यामुळे, काजळ सोबतच आयलायनर हा डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे.
आयलायनरमुळे आपल्या डोळ्यांना एक वेगळाच लूक येतो. पार्टीवेअर, ट्रॅडिशनल असं कोणतही फंक्शन असेल तरी तुम्ही आयलायनर उत्तम प्रकारे डिझाईन करू शकता. यामुळे, तुमच्या लूकला चारचॉंद लागतील यात काही शंका नाही.
आज आपण स्टायलिश लूकसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या आयलायनरच्या डिझाईन्स जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आयलायनर लावण्यासाठी शौकिन असालं तर मग या आयलायनर डिझाईन्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.
२ टोन आयलायनर या नावावरून तुम्हाला या आयलनरची डिझाईन कशी असेल ? याचा अंदाज आला असेल. या प्रकारच्या डिझाईनमध्ये जसे तुम्ही रेग्युलर आयलायनर डोळ्यांच्या वरच्या बाजूला लावता तसेच ब्लॅक आयलायनर लावायचे. आता त्यात, थोडा ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही कोणत्याही रंगाचे तुमच्या लूकला किंवा कपड्याला मॅच होणाऱ्या रंगाचे लायनर लावू शकता.
या प्रकारच्या आयलायनर डिझाईनला तुम्ही मल्टीकलर आयलायनर असे ही म्हणू शकता. या डिझाईनमध्ये तुम्ही विविध रंगांसोबत खेळू शकता. जर तुम्हाला डोळ्यांवर विविध रंगांचा वापर करायला आवडत असेल तर तुम्ही निर्धास्तपणे ही डिझाईन ट्राय करू शकता.
यासाठी डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या बाजूला ब्लॅक आयलायनर लावून घ्या, आणि त्यावर तुमच्या आवडीचे किंवा लूकला मॅच होणाऱ्या विविध रंगांच्या लायनरचा वापर करा.
या प्रकारच्या डिझाईनमध्ये तुम्ही आयलायनरसोबत ग्लिटरचा ही ट्विस्ट देऊ शकता. ही डिझाईन पार्टीवेअर लूकसाठी एकदम परफेक्ट आहे. विविध प्रकारचे चमकदार मेटॅलिक आयलायनर मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध आहेत.
हे चमकदार मेटॅलिक आयलनर तुम्ही रेग्युलर आयलायनर लावता त्याप्रमाणेच लावायचे आहे. फक्त हे लावताना त्याचा पातळ लेअर द्या. मग, त्यावर ग्लिटरचा ट्विस्ट द्यायला विसरू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.