Scrubs For Dry Skin : थंडीचे दिवस सुरू झाले की आपल्याला त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. त्यातल्या त्यात कोरड्या त्वचेची या दिवसांमध्ये खास काळजी घेणे गरजेचे असते. कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी हिवाळा फारच त्रासदायक ठरतो.
या दिवसांमध्ये त्वचेला जास्त मॉईश्चराईझ केल्यामुळे चेहऱ्यावर मृत त्वचा जास्त प्रमाणात जमा होऊ लागते. त्यामुळे, त्वचेचे स्क्रब करण्याची गरज पडू शकते. कोरड्या त्वचेवर कोणतेही स्क्रब केल्याने त्वचा आणखी कोरडी होण्याचा धोका असतो. कोणतेही स्क्रब करण्यापूर्वी ते आधी तुमच्या त्वचेला सूट होते का ? हे पाहणे महत्वाचे ठरते.
चेहऱ्याला स्क्रब सूट झाले नाही तर कोरडी त्वचा आणखी कोरडी पडू शकते. त्यामुळे, तुमची त्वचा लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्क्रबची निवड करणे आवश्यक आहे. कोरड्या त्वचेसाठी बाजारात अनेक प्रकारचे केमिकलयुक्त स्क्रब्स उपलब्ध आहेत.
परंतु, जर घरगुती स्क्रब्सचा त्वचेवर वापर केल्यास कोरड्या त्वचेला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. होममेड स्क्रब्समुळे कोरड्या त्वचेवर साचलेली मृत त्वचा, टॅनिंग निघून जाण्यास मदत मिळते आणि त्वचेला योग्य पोषण मिळते. आज आपण होममेड स्क्रब्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
२ चमचे साखर आणि १ चमचा मध एकत्र करून ते चांगले मिसळा. जेणेकरून चांगल्या प्रकारे साखर विरघळू शकेल. त्यानंतर, या स्क्रबने चेहऱ्यावर हलक्या हातांनी मसाज करा. २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
मधामुळे त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते आणि त्वचा मऊ राहते. साखरेमुळे चेहऱ्यावरील टॅनिंग आणि मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा या स्क्रबचा वापर करा.
कोरफड ही सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. कोरड्या त्वचेसाठी कोरफड आणि ओट्सचे स्क्रब लाभदायी आहे. ओट्समध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे ते चेहऱ्याला खोलवर साफ करण्यास मदत करते.
हे स्क्रब करण्यासाठी कोरफडचा गर घ्या आणि त्यामध्ये ३ चमचे ओट्स पावडर घ्या. आता, हे दोन्ही घटक चांगले मिक्स करा. आता या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने १० मिनिटे स्क्रब करा. त्यानंतर, २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून टाका.
कॉफीचे स्क्रब हे कोरड्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. हे स्क्रब तयार करण्यासाठी एका भांड्यात ३ चमचे कॉफी घ्या, आता त्यामध्ये पाणी मिसळा. आता या मिश्रणाने चेहऱ्याचे १५ मिनिटे स्क्रब करा. २० मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. कॉफीमध्ये असणारे लहान कण हे तुमची त्वचा स्क्रब करण्यास मदत करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.