Foods for Hemoglobin esakal
लाइफस्टाइल

Foods for Hemoglobin : शरीरात रक्ताची कमतरता जाणवतेय? मग, 'या' खाद्यपदार्थांच्या सेवनाने वाढवा हिमोग्लोबीनची पातळी

Foods for Hemoglobin : संतुलित आहारामध्ये अनेक घटकांचा समावेश करणे, महत्वाचे ठरते. जर आहार पौष्टिक नसेल तर मग आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Foods for Hemoglobin : आपले आरोग्य निरोगी रहावे, यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार अतिशय गरजेचा आहे. जर या दोन्ही गोष्टींचा समतोल तुम्ही साधला तर तुमचे आरोग्य निरोगी राहील, यात काही शंका नाही. संतुलित आहारामध्ये अनेक घटकांचा समावेश करणे, महत्वाचे ठरते. जर आहार पौष्टिक नसेल तर मग आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

अनेक महिला आणि लहान मुलांमध्ये खास करून हिमोग्लोबीनची कमतरता आढळून येते. आपल्या शरीरातील ऑक्सिजन हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्याचे काम लाल रक्तपेशी करतात. या लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबीन नावाचे प्रथिने आढळते. या हिमोग्लोबीनमुळे शरीरात ऑक्सिजनची ने –आण करणे सुलभ होते.

जेव्हा शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता निर्माण होते, तेव्हा अशक्तपणा, थकवा जाणवतो. यासोबतच इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. ही हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करणे फायद्याचे ठरते. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

डाळिंब

डाळिंब हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. डाळिंबामध्ये अनेक पोषकघटक आढळून येतात. त्यामुळे, या फळाचा आहारात जरूर समावेश करावा. अनेक जण असे म्हणतात की, डाळिंबाचा रंग लाल असल्यामुळे त्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्त वाढते. हे अगदी खरे आहे.

डाळिंब खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबीनची पातळी वाढण्यास मदत होते. डाळिंबामध्ये लोह, कॅल्शिअम आणि व्हॅटिमिन्सचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, या फळाचे अवश्य सेवन करा.

केळी

अनेकांना केळी खायला आवडतात. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विविध पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. खास करून प्रथिने, लोह आणि कॅल्शिअमचा प्रमुख स्त्रोत म्हणून ही केळीला ओळखले जाते. केळी खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

केळ्यामध्ये लोह आणि फॉलेट मोठ्या प्रमाणात आढळते. हे दोन्ही घटक हिमोग्लोबीन तयार करण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे, जेव्हा तुम्हाला अशक्तपणा, थकवा जाणवेल तेव्हा केळ्याचे जरूर सेवन करा. यामुळे, हिमोग्लोबीनची कमतरता भरून निघण्यास मदत होईल.

पालक

आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही हिरवी पालेभाजी अनेकांच्या आहाराचा प्रमुख भाग आहे. पालकचे सेवन आवर्जून केले जाते. या हिरव्या पालेभाजीमध्ये लोह आणि फॉलेट्स भरपूर आढळतात. जे हिमोग्लोबीन तयार करण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे, पालकचे सेवन केल्याने हिमोग्लोबीनची पातळी वाढण्यास मदत होते. तुमच्या आहारात पालकचा अवश्य समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT