Hemoglobin Level  esakal
लाइफस्टाइल

Hemoglobin Level : हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ फळांचा आहारात करा समावेश

शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता असेल तर अशक्तपणा आणि थकवा जाणवतो.

Monika Lonkar –Kumbhar

Hemoglobin Level : आपल्या शरीरात हिमोग्लोबीन म्हणजेच रक्ताची पातळी कमी होणे हे अनेक आजारांना निमंण देण्यासारखे असू शकते. शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता असेल तर आपल्याला अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. त्यामुळे, चक्कर येणे, शरीराचा थरकाप उडणे आणि अस्वस्थता जाणवण्याची शक्यता असते.

हिमोग्लोबीनची ही कमतरता भरून काढण्यासाठी आपण चांगला आहार घेणे महत्वाचे आहे. हिरव्या पालेभाज्या आणि फळांमधून आपण हिमोग्लोबीनची पातळी वाढवू शकतो. या कामी आपल्याला फळांची मदत होऊ शकते.

हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढण्यासाठी व्हिटॅमी बी १२, लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडने, झिंकने समृद्ध असलेल्या फळांचे सेवन करणे महत्वाचे आहे. या फळांमध्ये सर्वात आधी संत्र्याचा समावेश होतो. संत्र्यासोबत इतर अनेक फळे आहेत जी आपली हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. कोणती आहेत ही फळे ? चला तर मग जाणून घेऊयात.

संत्रा

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडने समृद्ध असलेले हे फळ हिमोग्लोबीनच्या पातळीमध्ये वाढ करण्यास मदत करू शकते. त्यामुळे, संत्र्याचा आहारामध्ये जरूर समावेश करा.

शिवाय, संत्रा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे. संत्र्यामुळे, शरीरातील रक्तपेशी तयार होण्यास मदत होते.

सफरचंद

सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, तर डॉक्टर रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंदामध्ये आढळून येणारी ही पोषकतत्वे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

कॅन्सर, मधुमेह इत्यादी अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम सफरचंद करते. सफरचंदामुळे हिमोग्लोबीनची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे, हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात सफरचंदाचा जरूर समावेश करा.

केळी

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, झिंक, कर्बोदके आणि फायबर्सचा समावेश आढळतो. त्यामुळे, केळी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. केळ्यामध्ये लोहाचे भरपूर प्रमाण आढळून येते, त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्यासाठी केळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

डाळिंब

व्हिटॅमिन A, C आणि E चा प्रमुख स्त्रोत डाळिंबामध्ये आढळून येतो. लोहाचे विपुल प्रमाण डाळिंबामध्ये आढळते. त्यामुळे, शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्यासाठी डाळिंबाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. आहारात समावेश करण्यासोबतच तुम्ही डाळिंबाचा ज्यूस ही पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT