Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : सांधेदुखीने त्रस्त असलेल्या रूग्णांनी आहारात 'या' फळांचा करावा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : संधिवात हा सांध्यांशी संबंधित असलेला गंभीर आजार आहे. मागील काही वर्षांमध्ये या आजाराने पीडित असलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संधिवाताने पीडित असलेल्या व्यक्तींना हिवाळ्यात खास करून जास्त त्रास होतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये संधिवाताच्या रूग्णांनी खास काळजी घेणे महत्वाचे आहे.

यासाठी आहारात देखील काही बदल करणे गरजेचे आहे. संधिवाताने पीडित असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात काही फळांचा समावेश करणे फायद्याचे ठरते. या फळांचे सेवन केल्याने त्यांना संधिवातापासून आराम मिळू शकतो. कोणती आहेत ही फळे? चला तर मग जाणून घेऊयात.

लाल रास्पबेरी (Red Raspberry)

संधिवाताचा त्रास झाल्यावर लाल रास्पबेरीचे फळ खाणे हे फायद्याचे ठरते. रास्पबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. लाल रास्पबेरीमध्ये अँथोसायनिन्स सारख्या दाहक-विरोधी घटकांचा समावेश असतो.

त्यामुळे, हे घटक संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी मदत करू शकतात. रास्पबेरीमध्ये व्हिटॅमिन सीचे भरपूर प्रमाण आढळून येते, जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. त्यामुळे, या फळाचे हिवाळ्यात अवश्य सेवन करा.

डाळिंब (Pomegranate)

डाळिंब हे फळ खायला सर्वांनाच आवडते. हिवाळ्यात तर या फळाचा खास सिझन असतो. या फळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स आणि कर्बोदकांचा समावेश आढळून येतो.

तसेच, डाळिंबामध्ये आढळून येणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल्समुळे जळजळ, संधिवाताच्या वेदना आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करण्यास मदत होते. त्यामुळे, या फळाचा तुमच्या आहारात समावेश करायल अजिबात विसरू नका.

स्ट्रॉबेरी (Strawberry)

ज्या व्यक्तींना संधिवाताचा त्रास आहे, अशा लोकांनी स्ट्रॉबेरीचे अवश्य सेवन करायला हवे. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमीन सी चे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, हे फळ आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते.

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमीन सी, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे संधिवाताची लक्षणे कमी करण्यासाठी मदत करतात. या फळाचे सेवन केल्याने, हातापायांना येणारी सूज देखील कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zeeshan Siddiqui Post: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया समोर, भावनिक पोस्ट लिहित म्हणाले...

Manoj Jarange News: पंकजाताईंनंतर धनुभाऊंना जरांगे फॅक्टर जड जाणार?

Kagal Assembly Elections 2024: सर्वच मतदारसंघात ‘पोस्टर वॉर’ जोरात; एकमेकांना डिवचण्याचा प्रकार, टीकात्मक वाक्यांनी रंगत

Chhatrapati Sambhajiraje: कोल्हापूरची जागा स्वराज्यला देणार, काँग्रेसने शब्द दिला होता पण... छत्रपती संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट

Ulhasnagar Vidhansabha Election : वंचित विकास आघाडीने पहिला उमेदवार केला जाहीर; या उमेदवाराला दिले तिकीट

SCROLL FOR NEXT