घरात लागणारा प्रत्येक महिन्याचा किराणा खरेदी करताना आपले एक खास बजेट ठरलेले असते. त्यातल्या त्यात जर काही घरगुती कार्यक्रम असेल किंवा कोणताही सण-समारंभ असेल तर तेव्हा आपले बजेट कोलमडून जाते.
आता अवघ्या काही दिवसांवर शारदीय नवरात्रौत्सव येऊन ठेपला आहे. त्याच्या पाठोपाठ लगेच दिवाळीचा सण ही तोंडावर आला आहे. त्यामुळे, किराण्यातील सामानाची लिस्ट ही आपोआप वाढणार. अनेकदा या सगळ्यात किराण्याचे बजेट कोलमडून जाते आणि पैशांची बचत ही होत नाही.
मात्र, आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत. या ट्रिक्स तुमच्या नक्कीच कामी येतील आणि तुमच्या पैशांची बचत देखील होईल. किराण्याचे सामान खरेदी करताना या ट्रिक्सचा नक्की वापर करा, मग बघा तुमच्या पैशांची कशी बचत होते ते. कोणत्या आहेत या ट्रिक्स ? चला तर मग जाणून घेऊयात.
अनेकदा काय होतं की, सण तोंडावर आलेला असतो आणि अनेक जण सामानाची कोणतीही यादी न करता, ते सामान खरेदी करायला जातात. मग, अशावेळी जे खरच महत्वाचं सामान आहे ते खरेदी करण्यास विसरणं किंवा नको ते सामान घेऊन येणं. या गोष्टी कित्येकांच्या हातून घडतात. या सगळ्यात प्रमाणापेक्षा जास्त पैसे खर्च होतात.
सणानिमित्त जे काही खाद्यपदार्थ बनवायचे आहेत त्याची एक यादी बनवा. त्यासोबतच इतर किराणा सामानाची यादी करा. एक लक्षात ठेवा की, जे किराणा सामान लागणार आहे आणि जे आवश्यक आहे तेच तुम्ही खरेदी करा. चुकूनही इतर न लागणाऱ्या गोष्टी खरेदी करू नका.
तुम्ही जर नेहमी स्थानिक सुपरमार्केटमधून किराणा सामान खरेदी करत असाल तर त्या सुपरमार्केटमध्ये असलेल्या रिवॉर्ड प्रोग्रॅमबद्दल माहिती करून घ्या. अनेक सुपरमार्केट या प्रकारच्या डिल्स चालवतात. ज्यामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी सतत किराणा सामान खरेदी करत असाल तर, त्या मार्केटकडून तुम्हाला या रिवॉर्ड प्रोग्रॅमद्वारे प्रचंड सूट दिली जाते.
या रिवॉर्ड प्रोग्रॅमसाठी तुम्हाला एका विशिष्ट वेळी ठराविक रक्कम असलेले सामान खरेदी करणे आवश्यक असते. अनेकदा हे प्रोग्रॅम फक्त दोनदा खरेदी करून ट्रिगर केले जाऊ शकतात. या रिवॉर्ड प्रोग्रॅममुळे तुमच्या पैशांची बचत केली जाऊ शकते.
तुम्ही तुमच्या किराण्यातील सामानापैकी जीवनावश्यक असणाऱ्या गोष्टींवर ६०% पैसे खर्च केले पाहिजेत, असा हा रूल सांगतो. या जीवनावश्यक गोष्टींमध्ये भाज्या, फळे, तांदूळ, मैदा, गहू, डाळी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या सर्व गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्यासाठी खर्च करायला हवा.
त्यानंतर, डेअरी, मांस, अंडी, चीज, बटर, सुकामेवा, प्रथिने इत्यादी सणांसाठी आवश्यक असणाऱ्या खाद्यपदार्थांवर ३०% पैसे खर्च करू शकता. त्यानंतर, राहिलेल्या १०% पैशांचा खर्च तुम्ही इतर खाद्यपदार्थांवर करू शकता. ज्यातून तुमच्या गरजा पूर्ण होतील आणि तुमचा अनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च ही होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.