Benefits Of Lobia Esakal
लाइफस्टाइल

Benefits Of Lobia : प्रथिनांचे ‘पॉवरहाऊस’ आहे चवळी; जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

चवळी हे एक सुपरफूड असून चवळीला प्रथिनांचे पॉवरहाऊस असे म्हटले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Lobia : प्रथिनांमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आपल्या शरीरातील मांसपेशी आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी प्रथिने महत्वपूर्ण भूमिका बजावतात. विविध प्रकारच्या डाळी, अंडी, चिकन, दूध, मांस इत्यादी घटकांना प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून ओळखले जाते.

या डाळींमध्ये चवळीचा ही समावेश होतो. चवळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. चवळी हे एक सुपरफूड असून चवळीला प्रथिनांचे पॉवरहाऊस असे म्हटले जाते. चवळीमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक आढळून येतात.

चवळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटक असल्यामुळे चवळीचा प्रामुख्याने आहारात समावेश केला जातो. चवळीची भाजी, आमटी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ चवळीपासून बनवले जातात. आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या चवळीचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

चवळीचे फायदे खालीलप्रमाणे

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

चवळीचे सेवन केल्यावर आपले पोट लवकर भरते. त्यामुळे, भूक कमी लागते. शिवाय, चवळी हे कमी उष्मांक असलेले कडधान्य आहे. चवळीमुळे आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच, चवळीमधील जीवनसत्वे आणि इतर पोषकघटक वजन कमी करण्यास मदत करतात.

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी लाभदायी

चवळीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. ज्यामुळे, आपले शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. शिवाय, विषारी घटक बाहेर पडल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते.

मधुमेहींसाठी फायदेशीर

चवळीमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे, मधुमेहींसाठी चवळीचा आहारात समावेश असणे महत्वाचे आहे. तसेच, चवळीचे सेवन केल्याने आहारातील कॅलरीजचे प्रमाण कमी होते. त्यामुळे, चवळीचा आहारात जरूर समावेश करा.

त्वचेसाठी चवळी उपयुक्त

आरोग्यासोबतच चवळी त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. चवळीमध्ये आढळून येणाऱ्या व्हिटॅमीन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रथिनांमुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन ए ही जीवनसत्वे आपल्या शरीरासाठी अँटिऑक्सिडंट्सच्या रूपात काम करतात. त्यामुळे, अँटिएजिंगसाठी देखील चवळी फायदेशीर ठरते.

चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स आणि वांगांचे काळे डाग कमी करण्याचे काम चवळी करते. थोडक्यात काय तर, चवळी त्वचेसाठी तितकीच फायदेशीर ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT