Hair Loss esakal
लाइफस्टाइल

Hair Loss Problems : वारंवार होणाऱ्या केसगळतीमुळे त्रस्त आहात? मग, आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

धूळ आणि प्रदूषण यांमुळे केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे, आजकाल अनेकांना कोंड्याची समस्या, केस गळती, केसांमध्ये फाटे फुटणे, केस अकाली पांढरे होणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Loss Problems : आपले आरोग्य निरोगी रहावे, यासाठी आपण आरोग्याची खास काळजी घेतो. मात्र, आरोग्यासोबतच त्वचेची आणि केसांची देखील खास काळजी घेणे महत्वाचे आहे. जर केसांची आणि त्वचेची खास काळजी घेतली तर आपले व्यक्तिमत्व आणखी खुलून दिसते, यात काही शंका नाही.

धूळ आणि प्रदूषण यांमुळे केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे, आजकाल अनेकांना कोंड्याची समस्या, केस गळती, केसांमध्ये फाटे फुटणे, केस अकाली पांढरे होणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागत आहे. केसांच्या या समस्यांमुळे केस पातळ आणि कोरडे दिसतात.

ज्यामुळे, आपला पूर्ण लूक बिघडतो. अनेक जण केसांच्या गळतीमुळे त्रस्त असतात. कारण, कित्येक उपाय करून ही केसगळतीची समस्या सुटलेली नसते. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करणे फायद्याचे ठरते. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

बदाम

केसांच्या वाढीसाठी ‘व्हिटॅमीन ई’ अतिशय फायदेशीर आहे. टाळूला निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई अतिशय प्रभावी आहे. बदामामध्ये व्हिटॅमीन ई चे मुबलक प्रमाण आढळून येते. या व्हिटॅमिन ई मुळे केसांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत होते.

व्हिटॅमीन ई व्यतिरिक्त बदामामध्ये आढळून येणारे इतर पोषकघटक केसांच्या समस्या दूर करण्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे, केसांच्या आरोग्यासाठी तुमच्या आहारात बदामाचा जरूर समावेश करा.

अंडी

प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंड्याला खास करून ओळखले जाते. आरोग्याची खास काळजी घेण्यासाठी आणि निरोगी केसांसाठी अंडी अतिशय लाभदायी आहेत. जर आपल्या शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर केसगळतीला सुरूवात होते.

अशा स्थितीमध्ये आहारात अंड्यांचा समावेश करणे फायद्याचे ठरते. अंड्याचे सेवन केल्याने केस निरोगी आणि घनदाट होण्यास मदत होते. त्यामुळे, केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करायला अजिबात विसरू नका.

पालक

हिवाळ्यात मार्केटमध्ये पालेभाज्या मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालकचा ही समावेश आहे. पालक ही पालेभाजी आपल्या आरोग्यासोबतच केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. पालकमध्ये लोह, व्हिटॅमिन ए आणि फॉलेट्स भरपूर प्रमाणात आढळतात.

हे सर्व पोषकघटक केसांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. या पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे केसगळती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, निरोगी केसांसाठी आणि केसांच्या चांगल्या वाढीसाठी पालकचा आहारात जरूर समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT