New Year 2024 esakal
लाइफस्टाइल

New Year 2024 : नवीन वर्षात निरोगी राहण्याचा करा संकल्प, ‘या’ सवयींचा करा अवलंब

आज या वर्षातला शेवटचा दिवस असून आपण सर्व जण उद्या नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. या नवीन वर्षात पदार्पण करताना अनेक जण स्वत:साठी संकल्प करतात. काही नवे प्लॅन्स आखतात.

Monika Lonkar –Kumbhar

New Year 2024 : आपण सर्वजण आता २०२३ च्या अखेरच्या टप्प्यात आहोत. आज या वर्षातला शेवटचा दिवस असून आपण सर्व जण उद्या नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. या नवीन वर्षात पदार्पण करताना अनेक जण स्वत:साठी संकल्प करतात. काही नवे प्लॅन्स आखतात.

मात्र, तुम्ही आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. निरोगी आरोग्यासाठी तुम्ही काही संकल्प केला आहे का? जर नसेल केला तर जरूर करा. नवीन वर्षात निरोगी राहण्यासाठी तुम्ही स्वत:ला काही निरोगी सवयी लावून घेऊ शकता.

तुम्ही आरोग्याला हानिकारक असणाऱ्या सवयी बदलून चांगल्या निरोगी सवयी लावण्याचा संकल्प करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही निरोगी सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या सवयींचा संकल्प तुम्ही नव्या वर्षात करू शकता.

तणावाला ठेवा दूर

कामाचा जास्त ताण घेतल्यामुळे याचा आपल्या शरीरावर तर परिणाम होतो. शिवाय, याचा आपल्या मानसिक आरोग्यावर ही परिणाम होतो. त्यामुळे, या नवीन वर्षात कामाचा अतिरिक्त ताण घेणे टाळा.

त्याऐवजी, तुम्ही कामाचा जास्त ताण घेण्याऐवजी हा ताण नियंत्रित करायला शिका. हा ताण नियंत्रित केल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य ठीक राहिल आणि तुम्हाला आरोग्याचे अनेक फायदे मिळतील.

खाण्या पिण्याच्या सवयी बदला

आजकाल अनेकांना जंक फूड खाण्याची जणू सवयच लागली आहे. जंक फूड खाल्ल्यामुळे याचा आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. वजन वाढणे, अनावश्यक चरबी वाढणे इत्यादी अनेक समस्या यामुळे निर्माण होतात.

त्यामुळे, जंक फूड खाण्याऐवजी तुम्ही निरोगी आहार घ्यायला सुरूवात करा. यासाठी तुम्ही घरचे जेवण खाण्याला प्राधान्य द्या आणि जंकफूड टाळा.

भरपूर पाणी प्या

पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. मात्र, अनेक जण पाणी कमी प्रमाणात पितात. यामुळे, आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे, या नव्या वर्षात निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे पचनक्षमता सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे, शरीर डिटॉक्स करणे सोपे होते.

शारिरीक हालचाल करा

फिट आणि तंदूरूस्त राहण्यासाठी तुम्ही नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामासोबत संतुलित आहार देखील महत्वाचा आहे. जवळपास जाताना गाडीचा वापर करण्याऐवजी तुम्ही चालत जा. लिफ्टच्या ऐवजी तुम्ही पायऱ्यांचा वापर करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT