Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : त्वचेमधील कोलेजनची पातळी नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी 'हे' घटक करतील मदत

कोलेजन हे एक प्रकारचे प्रोटिन आहे. जे त्वचेशी संबंधित असलेल्या समस्यांपासून त्वचेचे रक्षण करते.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : आपल्या वयानुसार जसे बदल शरीरात होतात. तसेच, बदल आपल्या चेहऱ्यावर देखील होतात. चेहऱ्यावर बारीक रेषा दिसणे किंवा चेहऱ्याची चमक गायब होणे ही सर्व लक्षणे त्वचेमध्ये कोलेजनचे प्रमाण कमी असल्याचे दर्शवतात. त्यामुळे, त्वचेची चमक आणि लवचिकता कमी होते.

खरं तर कोलेजन हे एक प्रकारचे प्रोटिन आहे. जे त्वचेशी संबंधित असलेल्या समस्यांपासून आपले संरक्षण करते. जेव्हा कोलेजनचे प्रमाण कमी होते, तेव्हा त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते.

हे कोलेजनचे प्रमाण वाढवण्यासाठी आजकाल अनेक जण विविध प्रकारचे केमिकल प्रॉडक्ट्स वापरतात.परंतु, शरीरात तयार होणाऱ्या कोलेजन नावाच्या प्रोटिनची मात्रा नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक घटकांचा वापर करू शकता.

आवळा

आरोग्यासोबतच, आवळा हा आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. आवळ्याचे काही थेंब चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.

कोलेजनसाठी आवळ्याचा असा करा वापर

आवळ्याच्या तेलाचे ४-५ थेंब मुलतानी मातीमध्ये मिसळा. आता, याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील डाग, सुरकुत्या आणि ब्लॅक सर्कल्स दूर होण्यास मदत होते. यासोबतच, कोलेजनचे प्रमाण वाढून त्वचेचा रंग ही उजळतो.

गुलाबाच्या पाकळ्या

गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबजल हे आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे, अनेक प्रकारच्या फेसपॅकमध्ये गुलाबजल आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा आवर्जून वापर केला जातो.

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रेटिंग घटक, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे, चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग दूर होतात.

शिवाय, गुलाबामध्ये असलेले व्हिटॅमिन 'अ' आणि 'क' हे शरीरातील कोलेजनची पातळी वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे, त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

कोलेजनसाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा असा करा वापर

८-१० गुलाबाच्या पाकळ्या घ्या. या पाकळ्या आता गुलाबजलसोबत मिक्सरमध्ये बारीक करा. आता, या मिश्रणात तुमच्या अंदाजानुसार मध घाला. आता, हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. या मिश्रणामुळे चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २-३ वेळा हा उपाय करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT