Dengue-Malaria Home Remedies esakal
लाइफस्टाइल

Malaria Home Remedies : डेंगू आणि मलेरियाला रोखायचे आहे ? दालचिनी आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय

Dengue Home Remedies : पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी डेंगू आणि मलेरियाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. गणेशोत्सवाच्या काळात पावसाने चांगलाच जोर धरल्याचे दिसून आले. पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी डेंगू आणि मलेरियाच्या रूग्णांची संख्या देखील वाढली.

डेंगू आणि मलेरियाच्या रूग्णांमध्ये लहान मुलांचे आणि वयोवृद्ध व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. त्यामुळे, लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींची या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

दवाखान्यातील उपचारांसोबतच काही घरगुती उपाय केल्यावर डेंगू आणि मलेरियापासून बचाव केला जाऊ शकतो. आज आपण डेंगू आणि मलेरियाला दूर ठेवणाऱ्या काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत.

डेंगू आणि मलेरियाला दूर ठेवणारे घरगुती उपाय खालीलप्रमाणे –

कडुलिंब

कडुलिंबामध्ये अनेक पोषकघटकांचा समावेश होतो. कडुलिंब ही अतिशय औषधी वनस्पती आहे. अनेक आजारांवर तसेच केस आणि त्वचेसाठी कडुलिंब फायदेशीर आहे.

कडुलिंबाच्या पानांचा रस हा डेंगू आणि मलेरियाला रोखण्याचे काम करतो. कडुलिंबाची ३-४ पाने घ्या. ही पाने पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर हे पाणी तुम्ही थोड्या-थोड्या अंतराने पिऊ शकता. यासोबतच तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा रस देखील पिऊ शकता. ही पाने कडू लागतात मात्र, या पानांचा रस आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

तुळस

तुळस ही औषधी वनस्पती असून ती अनेक आजारांवर फायदेशीर आहे. डेंगू आणि मलेरियाला रोखण्यासाठी तुळशीच्या पानांचा उपयोग पूर्वीच्या काळापासून केला जात आहे. तुळशीचा उपाय करण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये काही तुळशीची पाने घाला. हे पाणी आता चांगल्या प्रकारे उकळून घ्या. थंड झाल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. त्यानंतर, या तुळशीच्या पाण्यात लिंबाचा रस पिळून हे पाणी प्या.

पपई

पपई ही अनेक आजारांवर लाभदायी आहे. आयुर्वेदामध्ये पपईच्या पानांचा उपयोग अनेक विकारांवर केला जातो. पपईच्या पानांमध्ये अनेक पोषकतत्वांचा समावेश आढळतो.

डेंगू मलेरियाला दूर ठेवण्यासोबतच शरिरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवणे, पांढऱ्या पेशींची संख्या वाढवणे आणि न्यूट्रोफिल्स वाढविण्यासाठी पपईची पाने मदत करतात. पपईच्या पानांचा उपाय करण्यासाठी पपईची काही पाने पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर, हे पाणी थोड्य-थोड्या अंतराने पित रहा.

दालचिनी

मेलरिया आणि डेंगूच्या रूग्णांसाठी दालचिनीचा काढा अतिशय फायदेशीर मानला जातो. विशेष म्हणजे आयुर्वेदामध्ये दालचिनीचा काढा हा अनेक विकारांवर प्रभावशाली मानला जातो. दालचिनीमध्ये असलेले पोषकघटक हे अनेक विकारांवर लढण्यासाठी मदत करतात. तसेच, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दालचिनीचा काढा मदत करतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT