Green Tea for Glowing Skin  esakal
लाइफस्टाइल

Green Tea for Glowing Skin : चेहऱ्यावर चमक हवी आहे ? ग्रीन टी आहे मदतीला! बनवा ‘हे’ फेस पॅक

ग्रीन टी हा फक्त आरोग्यासाठी नाही तर, त्वचेसाठी देखील लाभदायी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Green Tea for Glowing Skin : ग्रीन टी पिणे हा अनेकांच्या जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग झाला आहे. ग्रीन टी पिण्याचे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिणे हे अतिशय फायदेशीर मानले जाते.

परंतु, ग्रीन टी हा फक्त आरोग्यासाठी नाही तर, त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. ग्रीन टी मध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटक उपलब्ध असतात. या पोषकघटकांमध्ये पॉलिफेनोल्स नावाचे एक अ‍ॅंटीऑक्सिडंट्स असते, जे त्वचेला थंडावा देते. तसेच, त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.

शिवाय, त्वचेला अ‍ॅंटीएजिंगचे गुण देण्यात ग्रीन टी महत्वपूर्ण भूमिका बजावते. या ग्रीन टी पासून आपण घरच्य घरी त्वचेसाठी फायदेशीर असणारे फेस पॅक बनवू शकतो. या ग्रीन टीसोबत घरातील फक्त २ गोष्टींचा वापर करून हे २ फेस पॅक सोप्या पद्धतीने बनवा.

चला तर मग जाणून घेऊयात ग्रीन टी पासून बनवले जाणारे हे फेस पॅक.

१. ग्रीन टी आणि तांदळाचे पीठ

हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात २-३ चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये २ चमचे ग्रीन टी आणि १ चमचा लिंबाचा रस मिसळा. याची छान पेस्ट बनवून घ्या.

तुमचा फेस पॅक तयार आहे. हा फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी ठेवा आणि चेहरा धुवून टाका. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून २-३ वेळा चेहऱ्यावर हा फेस पॅक लावू शकता.

२. ग्रीन टी आणि हळद

हळद ही आरोग्यासाठी वरदान तर आहेच, शिवाय चेहऱ्यासाठी हळदीचा वापर आवर्जून केला जातो. हळदीमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. शिवाय, हळदीतील इतर पोषकद्रव्यांमुळे त्वचेतील समस्या दूर होतात.

ग्रीन टी आणि हळदीपासून बनवला जाणारा हा फेस पॅक सर्व त्वचा प्रकारांसाठी वापरला जाऊ शकतो. हा फेस मास्क त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करतो. तसेच, चेहऱ्यावरील डेड स्किन अर्थात मृत त्वचा काढून टाकण्याचे काम हा फेस पॅक करतो.

हा फेस पॅक करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे बेसन, अर्धा चमचा हळद आणि बनवलेला ग्रीन टी एकत्रपणे मिक्स करा. याची छान पेस्ट करून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांसाठी हा फेस पॅक चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT