Magnesium rich foods  esakal
लाइफस्टाइल

Magnesium rich foods : तुमच्या शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता आहे? मग, आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

Magnesium rich foods : आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे असणारे पोषकतत्व म्हणजे मॅग्नेशिअम होय. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहित असेल. मॅग्नेशिअम हे पोषकतत्व आपल्या शरीरातील स्नायू तयार करण्यास आणि नसा निरोगी ठेवण्यास मदत करते.

Monika Lonkar –Kumbhar

Magnesium rich foods : निरोगी जीवनशैलीसाठी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यातील एक म्हणजे नियमितपणे व्यायाम आणि दुसरी म्हणजे संतुलित आहार होय. आपल्या संतुलित आहारामध्ये शरीराला आवश्यक असणारे कॅल्शिअम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्वे इत्यादी घटकांनी युक्त असलेले खाद्यपदार्थ असणे गरजेचे आहे.

मात्र, यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे असणारे पोषकतत्व म्हणजे मॅग्नेशिअम होय. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहित असेल. मॅग्नेशिअम हे पोषकतत्व आपल्या शरीरातील स्नायू तयार करण्यास आणि नसा निरोगी ठेवण्यास मदत करते. एवढच नव्हे, तर आपले शरीर पूर्णपणे कार्यक्षम बनविण्यात मॅग्नेशिअम मदत करते.

शरीरात मॅग्नेशिअमची जर कमतरता असेल तर शरीराच्या काही भागांमध्ये मुंग्या येणे, बधीरपणा, स्नायू क्रॅम्प्स, व्हेरिकोज व्हेन्स, भूक न लागणे, दमा, निद्रानाश, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. आपल्या शरीरातील मॅग्नेशिअमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही काही खाद्यपदार्थांची मदत घेऊ शकता. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ चला तर मग जाणून घेऊयात.

ज्वारीची भाकरी

ज्वारीमध्ये फायबर्स आणि मॅग्नेशिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीचा वापर करून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला मॅग्नेशिअमचा पुरवठा होतो. शिवाय, यामुळे, शरीरातील मॅग्नेशिअमची कमतरता भरून काढण्यास मदत होते. त्यामुळे, तुमच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा जरूर समावेश करा.

केळी

केळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम आढळून येते. आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील हाडांना बळकटी मिळवून देण्यासाठी केळी हा अत्यंत चांगला पर्याय आहे.

या शिवाय, केळ्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशिअम आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या मॅग्नेशिअमची कमतरता पूर्ण करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे, तुमच्या आहारात केळ्यांचा समावेश करायला अजिबात विसरू नका.

काजू-बदाम

काजू-बदाम या सुकामेव्यापासून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीराला आवश्यक असणारे प्रथिने, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फायबर्स इत्यादी पोषकघटक आपल्याला काजू-बदामचे सेवन केल्याने मिळतात. त्यामुळे, रोज मूठभर काजू-बदामचे सेवन करा.

यामुळे, शरीरातील मॅग्नेशिअमची कमतरता भरून काढण्यास मदत मिळेल. यासोबतच तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील काजू-बदाम फायदेशीर आहे. त्यामुळे, तुमच्या आहारात काजू-बदामचा अवश्य समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT