Winter Makeup Tips esakal
लाइफस्टाइल

Winter Makeup Tips : हिवाळ्यात नैसर्गिक आणि नॉन ऑयली मेकअप लूक हवाय? मग, 'या' टीप्स करा फॉलो

हिवाळ्यात मेकअप करताना चुकूनही निष्काळजीपणा करू नका.

Monika Lonkar –Kumbhar

Winter Makeup Tips : थंडीला नुकतीच सुरूवात झाली आहे. या दिवसांमध्ये आपण आरोग्याची, त्वचेची आणि केसांची खास काळजी घेतो. हिवाळा हा ऋतू पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे, या दिवसांमध्ये लोक खास पर्यटनासाठी जातात. हिवाळ्यात बहुतेक करून विवाह देखील होतात.

या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेण्यासोबतच मेकअपची देखील खास काळजी घेणे महत्वाचे असते. या ऋतुचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे, चेहऱ्यावर अनेक बदल होतात. त्याचा प्रभाव मेकअपवर देखील दिसून येतो.

त्यामुळे, हिवाळ्यात मेकअप करताना चुकूनही निष्काळजीपणा करू नका. अन्यथा याचा परिणाम लगेच त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे, मेकअप केल्यावर चेहरा सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसू लागतो.

आज आम्ही खास हिवाळ्यात मेकअप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? त्याबदद्ल काही सोप्या टीप्स सांगणार आहोत. कोणत्या आहेत त्या टीप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

फेशिअल ऑईल

जर तुम्हाला चेहऱ्यावर मिनिमल मेकअप ठेवायचा असेल, तर फेशिअल ऑईल यासाठी बेस्ट आहे. यासाठी शक्यतो नैसर्गिक तेलाचा चेहऱ्यावर वापर करणे फायद्याचे ठरेल.

यासाठी कोणतेही एक नैसर्गिक फेशिअल ऑईल घ्या ते फाऊंडेशन किंवा कोणत्याही ग्लोईंग क्रीममध्ये मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने तुम्हाला नैसर्गिक ग्लो देखील मिळेल आणि चेहरा फ्रेश दिसेल.

नॉन ऑयली मॉईश्चरायझर

हिवाळ्यात त्वचा अधिक कोरडी पडते. त्यामुळे, त्वचेवर मॉईश्चरायझरचा वापर आवर्जून केला जातो. मात्र, बहुतेक मॉईश्चरायझर्स चेहऱ्यावर लावल्यावर त्वचा अधिक तेलकट दिसते. त्यामुळे, मेकअप देखील खराब दिसू लागतो.

ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही हिवाळ्यात चेहऱ्यावर मेकअप करताना नॉन ऑयली मॉईश्चरायझरचा वापर अवश्य करा. हे नॉन ऑयली मॉईश्चरायझर चेहऱ्याला लावल्याने हे त्वचेसाठी आणि मेकअपसाठी फायद्याचे ठरेल.

लिपस्टिक

हिवाळ्यात मॅट लिपस्टिक्सचा ओठांवर वापर केल्याने ओठ आणखी कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे, थंडीच्या दिवसांमध्ये मॅट लिपस्टिकचा वापर करणे टाळा. त्याऐवजी, तुम्ही क्रीमी लिपस्टिकचा वापर करू शकता.

क्रीमी लिपस्टिकमुळे ओठ कोरडे दिसणार नाहीत. तसेच, ही क्रीमी लिपस्टिक वापरण्यापूर्वी ओठांवर मॉईश्चरायझिंग लिपबाम लावायला विसरू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT