Mental Health Tips  esakal
लाइफस्टाइल

Mental Health Tips : दिवसभरातील ताण-तणावानंतर स्वत:ला असे करा रिचार्ज, करा 'या' अ‍ॅक्टिव्हिटी

ताण-तणावाचा आपल्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Mental Health Tips : आजकाल कामाच्या वाढत्या प्रेशरमुळे तणाव ही सामान्य समस्या झाली आहे. मात्र, या समस्येकडे सामान्य म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नका. या तणावामुळे व्यक्ती त्रस्त होऊन जाते आणि या तणावातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागते.

या तणावाचा आपल्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो. दिवसभराच्या कामाच्या दबावामुळे जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर काही टीप्सच्या मदतीने तुम्ही स्वत:ला रिलॅक्स आणि रिचार्ज करू शकता. या टीप्समुळे तुम्हाला तणावातून बाहेर पडायला नक्कीच मदत होईल.

आज आम्ही तुमच्याशी अशाच काही टीप्स शेअर करणार आहोत. ज्यामुळे, तुम्हाला तणावातून बाहेर पडण्यास मदत मिळेल आणि तुम्ही छान रिचार्ज व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात या टीप्स.

फॅमिली फ्रेंड्ससोबत वेळ घालवा

आपल्या फॅमिलीसोबत आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवणे हे मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे, लोकांमध्ये मिसळा आणि त्यांच्यांसोबत वेळ घालवा. यामुळे, तणाव कमी होतो आणि मन शांत होते. तसेच, मूड ही चांगला राहतो.

गाणी ऐका

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही गाणी ऐकू शकता. यामुळे, तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होते. गाणी ऐकणे आणि डान्स करणे हा तणाव दूर करण्याचा चांगला मार्ग मानला जातो. गाणी ऐकल्याने तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत होते. शिवाय, तुमचे मन शांत राहण्यास मदत होते.

मेडिटेशन

दिवसभरातील काम आणि थकवा दूर करण्यासाठी मेडिटेशन आणि योगा हा सर्वात चांगला पर्याय आहे. मेडिटेशन केल्याने तुमचा ताण-तणाव दूर होण्यास मदत तर होतेच, शिवाय तुम्हाला छान फ्रेश वाटते. मेडिटेशन केल्याने मन:शांती मिळते. त्यामुळे, मानसिक शांतता आणि समाधान मिळते.

सूर्यप्रकाशात काही वेळ घालवा

सूर्यप्रकाशात वेळ घालवल्याने मूड सुधारतो आणि ताण-तणाव कमी होतो. खरे तर सूर्यप्रकाशामुळे मेंदूतील सेरोटोनिन हार्मोन्सचे उत्पादन वाढते, यामुळे मूड नियंत्रित राहण्यास मदत होते. या हार्मोनमुळे मूड चांगला राहतो आणि ताण-तणाव दूर होऊन मन आनंदी राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT