Dry Skin Care : हिवाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडायला लागली आहे. हवामान बदलले की त्याचा आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर लगेच परिणाम दिसून येतो. हिवाळ्यामध्ये तर आपल्याला त्वचेची खास काळजी घ्यावी लागते.
या दिवसांमध्ये त्वचा आणखी कोरडी होते. त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. कोरडी त्वचा असणाऱ्या लोकांची त्वचा तर आणखी कोरडी पडण्याची शक्यता असते. या दिवसांमध्ये आपण त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली तर त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
अनेकदा त्वचेला योग्य पोषण न मिळाल्यामुळे किंवा त्वचेची काळजी न घेतल्यामुळे त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. मात्र, कधी कधी कळत-नकळतपणे चुकीच्या पद्धतीने स्किनकेअर रूटीन फॉलो केल्यामुळे त्वचा आणखी कोरडी पडते. आजच्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला आज त्या चूकांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे, त्वचा जास्त कोरडी पडते.
त्वचा हायड्रेट ठेवणे हे त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. जर तुम्ही वेळच्या वेळी त्वचा हायड्रेट नाही ठेवली तर, तुमची त्वचा हळूहळू कोरडी होणार.
त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान २ वेळाच चेहऱ्यावर शीट मास्कचा वापर करा. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये फेस ऑईल आणि फेस सीरमचा वापर अवश्य करा. यामुळे, त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.
जर तुम्ही त्वचेची योग्य प्रकारे काळजी नाही घेतली तर त्वचा कोरडी होऊ शकते. हिवाळ्यात तर हा त्रास आणखी संभवतो.
त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि काळ्या डागांची समस्या दूर करण्यासाठी आपण वेळोवेळी स्क्रबिंग करतो. मात्र, याला मर्यादा ही आहेत. हे आपण लक्षात घ्यायला हवे.
हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होण्यास सुरूवात होते. मात्र, या दिवसांमध्ये तुम्ही चुकून सुद्धा जास्त प्रमाणात चेहऱ्याचे स्क्रबिंग केले तर मग तुमची त्वचा आणखी कोरडी होणार यात काही शंका नाही. त्यामुळे, या दिवसांमध्ये आठवड्यातून एकदाच चेहऱ्याचे स्क्रबिंग करा. स्क्रबिंग केल्यावर चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावायला विसरू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.