Papaya For Skin  esakal
लाइफस्टाइल

Papaya For Skin : चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी फायदेशीर आहे पपई, जाणून घ्या ‘हे’ फेसपॅक्स

पपई आपल्या आरोग्यासाठी आणि चेहऱ्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Papaya Face Packs : रोजचे धावपळीचे आयुष्य, अयोग्य आहार, धूळ, प्रदूषण आणि व्यायामाचा अभाव यामुळे, आपल्या आरोग्यावर विविध परिणाम होतात. आरोग्यासोबतच या सगळ्यांचा परिणाम आपल्या त्वचेवर ही होतो. धूळ, प्रदूषणामुळे तर त्वचा निस्तेज दिसू लागते आणि त्वचा काळवंडते. त्यामुळे, त्वचेची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

त्वचा काळवंडल्यास किंवा त्वचेच्या समस्या निर्माण झाल्यावर आपण विविध स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा वापर करतो. हे प्रॉडक्ट्स महागडे देखील असतात. परंतु, त्वचेच्या या सगळ्या समस्यांवर तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता.

पपई आपल्या आरोग्यासाठी आणि चेहऱ्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पपईमध्ये असलेल्या अनेक गुणधर्मांमुळे पपई त्वचेवर ही जादुई पद्धतीने काम करते. आज आपण चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी फायदेशीर असलेल्या पपईचे फेस पॅक्स जाणून घेणार आहोत.

पपई आणि कोरफड

पपईमुळे चेहरा उजळण्यास मदत मिळेल आणि कोरफडमुळे त्वचा हायड्रेटेड राहील. पपई आणि कोरफडचा फेस पॅक बनवण्यासाठी १ वाटीभर पपईचे तुकडे घ्या. ते चांगले बारीक करून घ्या. त्यामध्ये कोरफडीचा गर किंवा कोरफड जेल मिक्स करा.

आता तुमचा फेस पॅक तयार आहे. हा फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा.

पपई आणि टोमॅटो

पपईच्या चार फोडी घ्या. आता १ टोमॅटो घ्या. तो बारीक चिरून घ्या. हे दोन्ही घटक आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. हा फेसपॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका. तुम्ही चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता.

पपई आणि गाजर

३-४ पपईच्या फोडी घ्या आणि १ गाजर किसून घ्या. आता किसलेला गाजर आणि पपईच्या फोडी एकत्रितपणे बारीक करून घ्या. तुम्हाला हवं तर त्यात तुम्ही गुलाबजल मिक्स करू शकता. तुमचा फेस पॅक आता तयार आहे. हा फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून ३ वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा.

पपई आणि काकडी

पपईच्या ४-५ फोडी स्मॅश करून घ्या. एक काकडी किसून घ्या. आता काकडी आणि पपई एकत्रित करून त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट आता चेहऱ्याला लावा. २०-२५ मिनिटांसाठी हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी पपई आणि काकडीचा हा फेसपॅक आठवड्यातून २ वेळा चेहऱ्यावर लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT