Skin Care : सध्या वेडिंग सिझन सुरू आहे. लग्नाच्या दिवशी प्रत्येक तरूणीची इच्छा असते की, ती सर्वात सुंदर दिसावी. यासाठी ती आटोकाट प्रयत्न करत असते. लग्नाच्या कित्येक दिवस आधीपासूनच तरूणींची तयारी सुरू असते.
यासाठी, मग ब्युटी ट्रीटमेंट्स, स्किनकेअर आणि हेअरस्टाईल्स इत्यादींची मदत घेतली जाते. परंतु, ब्रायडल ग्लो जर तुम्हाला परफेक्ट हवा असेल तर त्यासाठी तुम्ही त्वचेची खास काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. कोणत्या आहेत या टीप्स? चला तर मग जाणून घेऊयात.
चेहरा रोज चांगल्या प्रकारे स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही क्लिंजींग मिल्क, माईल्ड फेसवॉशचा वापर करू शकता. तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या फेस वॉशचा वापर करा. हे नेहमी लक्षात ठेवा.
यामुळे, त्वचेवरील घाण, धूळ किंवा तेलकट घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे, रोजच्या रोज चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे गरजेचे आहे.
त्वचा चांगल्या प्रकारे स्वच्छ केल्यानंतर टोनरचा वापर करायला विसरू नका. त्वचा साफ केल्यानंतर ही कधीकधी त्वचेवरील घाण, धूळ पूर्णपणे निघून जात नाही. त्यामुळे, टोनरचा वापर करणे गरजेचे आहे. टोनरचा वापर केल्यामुळे मेकअप देखील चांगल्या प्रकारे ब्लेंड होण्यास मदत होते. त्यानंतर, त्वचेवर मॉईश्चरायझर लावायला विसरू नका.
आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करणे हे त्वचेसाठी खूप आवश्यक आहे. स्क्रबिंग केल्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे, चेहऱ्याचे स्क्रबिंग करणे गरजेचे आहे.
स्क्रबिंग करताना तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात ठेवा, त्यानुसार स्क्रबची निवड करा. जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर आठवड्यातून २ वेळा स्क्रबिंग करणे आवश्यक आहे. या उलट जर तुमची त्वचा कोरडी असेल तर आठवड्यातून एकदाच स्क्रबिंग करा.
फेसपॅक हा त्वचेच्या ग्लोसाठी महत्वाचा आहे. फेसपॅक लावल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय, त्वचेवर उजळपणा येतो. कोरफड जेल ही त्वचेच्या सर्व प्रकारांना सूट होते. त्यामुळे, कोरफडपासून बनवल्या जाणाऱ्या फेसपॅकचा त्वचेवर अवश्य वापर करावा. यामुळे, त्वचेवर छान चमक देखील येईल. फेसपॅकचा वापर त्वचेवर आठवड्यातून एकदा नक्की करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.