vitamin  sakal
लाइफस्टाइल

Vitamin B12 deficiency: व्हिटामीन B-12 ची कमतरता दूर करतील हे पदार्थ; आसपासही भटकणार नाहीत आजार

व्हिटॅमिन बी १२ हे जीवनसत्त्वे आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

Aishwarya Musale

आपल्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी दररोज अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आवश्यक असतात, परंतु आजकालच्या खराब अन्नामुळे शरीराला जीवनसत्त्वे मिळतच नाहीत. यामुळे व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होते. यामध्ये व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची अधिक प्रकरणे पाहिली जात आहेत.

डॉक्टरांच्या मते, व्हिटॅमिन बी 12 चे काम रेड ब्लड सेल्स बनवणे आणि मज्जासंस्था चांगली ठेवणे हे आहे. त्याची कमतरता मेंदूच्या कार्यावरही परिणाम करू शकते. अशा परिस्थितीत या जीवनसत्त्वाची कमतरता हलक्यात घेऊ नये

डॉक्टरांच्या मते, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, न्यूरोलॉजिकल समस्या, त्वचा पिवळी पडणे, वजन कमी होणे आणि हार्ट बीट वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. शरीरात या जीवनसत्त्वाची सतत कमतरता राहिल्यास डोकेदुखी, कोणत्याही कामात लक्ष न लागणे, तोंडाला फोड येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

दररोज किती व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे

प्रौढ व्यक्तीला दररोज 2.4 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी 12 आवश्यक असते. एवढ्या प्रमाणात जीवनसत्व उपलब्ध नसेल तर त्याची कमतरता शरीरात सुरू होते. हे ओळखण्यासाठी, व्हिटॅमिन बी 12 ची नियमित तपासणी करा. जर ते कमी होत असेल तर आहाराकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉक्टर काही औषध घेण्याचा सल्ला देऊ शकतात. किंवा व्हिटॅमिन बी 12 इंट्रामस्क्युलर इंजेक्शन घेण्याचा सल्ला देऊ शकता. याशिवाय काही पदार्थांचा आहारात समावेश करूनही या जीवनसत्त्वाची कमतरता टाळता येते.

या पदार्थांचा आहारात समावेश करा

शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही बदाम, दूध, दही, मासे, अंडी किंवा लाल मांस यांसारख्या आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. या पदार्थांव्यतिरिक्त आपल्या आहारात हिरव्या आणि पालेभाज्यांचा समावेश करा. तसेच दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

SCROLL FOR NEXT