International Mind-Body Wellness Day 2024  esakal
लाइफस्टाइल

International Mind-Body Wellness Day 2024 : तुमच्या शरीराला आणि मनाला आराम देण्यासाठी करा 'ही' योगासने

मन आणि शरीर निरोगी रहावे, यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. नियमित योगासने केल्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

Monika Lonkar –Kumbhar

International Mind-Body Wellness Day 2024 : दरवर्षी जगभरात ३ जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय माईंड-बॉडी वेलनेस डे म्हणून साजरा केला जातो. मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा या दिनामागचा मुख्य हेतू आहे.

मन आणि शरीर निरोगी रहावे, यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. नियमित योगासने केल्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. त्यामुळे, आज आपण या खास माईंड-बॉडी वेलनेस दिनानिमित्त आपले मन आणि शरीराला आराम देणाऱ्या काही सोप्या योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत.

वृक्षासन

वृक्षासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. वृक्षासन हे प्रामुख्याने एक संतुलित योगासन आहे. ज्यामध्ये शारिरीक आणि मानसिक संतुलनाचा समतोल साधला जातो. हे योगासन आपले शरीर निरोगी ठेवण्यासोबतच आपले मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवते. त्यामुळे, नियमितपणे हे योगासन करण्याचा सल्ला दिला जातो.

वृक्षासन

वृक्षासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी मॅटवर सरळ रेषेत उभे रहा.

  • तुमचे दोन्ही हात बाजूला ठेवा.

  • आता तुमच्या उजव्या पायाचा गुडघा वाकवा आणि डाव्या पायाच्या मांडीवर हा उजवा पाय ठेवा.

  • आता तुमचे दोन्ही हात वरती नेऊन ते एकमेकांना जोडून ठेवा.

  • या स्थितीमध्ये तुमचा डावा पाय हा सरळ आणि ताठ असायला हवा.

  • या स्थितीमध्ये तुमची नजर सरळ आणि पाठ-मान ताठ असायला हवी. आता तुमच्या संपूर्ण शरीराला ताण जाणवेल.

  • ३०-४० सेकंद तुम्ही याच स्थितीमध्ये थांबा. त्यानंतर, श्वास सोडा आणि सामान्य स्थितीमध्ये या.

शवासन

शवासन हे योगासन सर्व योगासनांमधील सर्वात सोपे योगासन आहे. हे योगासन केल्याने मनाची एकाग्रता वाढते. मन आणि शरीर यांच्यातील संतुलन सुरळीत होऊन मन आणि शरीरात ताजेपणा राहतो. हे योगासन करताना फक्त डोळे मिटून शांत झोपावे लागते आणि संपूर्ण शरीर सैल सोडावे लागते. हे योगासन केल्याने ताण-तणाव दूर होऊन मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

शवासन

शवासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी मॅटवर सरळ रेषेत झोपा.

  • आता तुमचे डोळे शांत मिटा आणि शरीर सैल सोडा.

  • तुमचे दोन्ही हात शरीराच्या बाजूने असावेत मात्र, ते सरळ नसावेत.

  • हाताचे दोन्ही तळवे उघडे आणि समोरासमोर असावेत.

  • आता दीर्घश्वास घ्या आणि १५-२० सेकंदांने श्वास सोडा.

  • हे योगासन करताना मन आणि शरीर शांत आणि रिलॅक्स ठेवा. डोक्यात कोणतेही विचार आणू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT