Yoga For Migraine Esakal
लाइफस्टाइल

Yoga For Migraine : मायग्रेन म्हणजे काय? आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ योगासनांचा सराव

मायग्रेनच्या समस्येवर योगा देखील फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Migraine : आजकालचे धावपळीचे जीवन, कामाचा ताण, बिघडलेली जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांसोबतच कामाचा अधिक ताण घेतल्याने आणि वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांमुळे अनेकांना नैराश्याची समस्या भेडसावत आहे. त्यामध्ये डोकेदुखी, थकवा आणि मायग्रेनच्या समस्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

मायग्रेनच्या समस्येसाठी अनेकजण ट्रीटमेंट घेतात. गोळ्या औषधे घेतात. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की मायग्रेनच्या समस्येवर योगा देखील फायदेशीर आहे. संशोधन आणि काही योगा तज्ज्ञांच्या मते योगामुळे मायग्रेनच्या समस्येवर आराम मिळू शकतो.

आज आपण मायग्रेन म्हणजे काय? आणि मायग्रेनची समस्या दूर करण्यासाठी कोणती योगासने फायदेशीर आहेत? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मायग्रेन म्हणजे काय?

खरं तर मायग्रेन हा मेंदूशी संबंधित असलेला एक आजार आहे. हा आजार डोकेदुखीच्या स्वरूपामध्ये होतो. मायग्रेनमध्ये डोकेदुखीचा भयंकर त्रास होतो. त्यामुळे, या वेदना सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळ्या असतात.

मायग्रेनमध्ये डोकेदुखी इतकी वाढते की, त्या वेदना सहन करणे फार कठीण होते. मायग्रेनची समस्या काहींना अर्ध्या डोक्यामध्ये होते तर काहींचे संपूर्ण डोके दुखते.

मायग्रेनची समस्या होण्यमागे अनेक वैद्यकीय आणि सामान्य कारणे असू शकतात. ज्यामध्ये काही सामान्य कारणे जसे की, फॅमिली हिस्ट्री (कौटुंबिक इतिहास), ताण-तणाव, चिंता, नैराश्य किंवा अल्कोहोलचे अधिक सेवन करणे इत्यादी कारणे त्यामागे असू शकतात.

मायग्रेनच्या समस्येवर ही योगासने आहेत फायदेशीर

बालासन

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी बालासन फायदेशीर आहे. हे योगासन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • बालासन करण्यासाठी सर्वात आधी रिलॅक्स होऊन सरळ पाय पसरून जमिनीवर बसा.

  • त्यानंतर तुमचे दोन्ही पाय वाकवून ते नितंबांच्या खाली ठेवा.

  • आता कंबर पुढे वाकवा आणि डोक्याला जमिनीचा स्पर्श करा.

  • दोन्ही हात डोक्यासमोर सरळ स्थितीमध्ये ठेवा.

  • लक्षात ठेवा, तुमचे दोन्ही हातांचे तळवे जमिनीच्या दिशेने असावेत.

  • ३० सेकंदांपर्यंत याच स्थितीमध्ये रहा.

  • रोज नियमितपणे या योगासनाचा सराव करा.

हलासन

मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमितपणे हलासनाचा सराव करणे फायदेशीर ठरते. हे हलासन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • हलासन करण्यासाठी पाठीवर सरळ झोपा.

  • ९० अंशाच्या कोनामध्ये पाय वर करा.

  • दोन्ही पाय वर करताना तुमच्या हातांनी कमरेला आधार द्या.

  • या दरम्यान, श्वास घ्या आणि सरळ पाय डोक्याच्या दिशेने वाकवा.

  • जेणेकरून तुमचे दोन्ही पाय डोक्याच्या मागच्या बाजूला राहतील.

  • आता, दोन्ही पायांच्या बोटाने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

  • आता याच स्थितीमध्ये ३० सेकंदांपर्यंत रहा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT