Yoga Tips : सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, रात्रीच्या जागरणामुळे झोप पूर्ण न होणे इत्यादी अनेक कारणांमुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांनी लोकांना ग्रासले आहे. या स्थितीमध्ये लोकांना दिवसभर थकवा जाणवतो.
जर तुम्ही पुरेशी विश्रांती घेतली किंवा कोणतेही काम केले नाही तरी सुद्धा तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवत राहतो.
खरे तर या स्थितीला क्रॉनिक फटीग सिंड्रोम असे म्हणतात. हा थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी मग अनेकांना दिवसभर झोपावे वाटते. मात्र, केवळ झोपून, या समस्येचे निराकारण होणार नाही. यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता.
जर तुम्ही नियमितपणे योगासनांचा सराव केला, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुमचा स्टॅमिनाही वाढण्यास मदत होईल. यामुळे, तुमचे शरीर उत्साही आणि तंदूरूस्त राहील. जर तुम्हाला शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही या योगासनांची मदत घेऊ शकता. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.
धनुरासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाचा जर तुम्ही नियमितपणे सराव केला तर, शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होईल. एवढेच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी हे योगासन लाभदायी आहे. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी देखील तुम्ही या योगासनाचा नियमितपणे सराव करू शकता.
हे धनुरासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपा. आता तुमच्या दोन्ही पायांचे घोटे हातांनी पकडण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर, डोके, छाती आणि मांड्या वरच्या बाजूला सरळ स्थितीमध्ये ठेवा. या स्थितीमध्ये तुमच्या शरीराचे वजन पोटाच्या खालच्या भागावर तुम्हाला जाणवेल. काही सेकंद या स्थितीमध्ये रहा त्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. नियमितपणे या योगसनांचा सराव केल्याने, तुमच्या शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होऊ शकेल. (Dhanurasana)
उंची वाढवण्यासाठी आणि शरीराला ताण देण्यासाठी हे योगासन अतिशय लाभदायी आहे. या योगासनामध्ये संपूर्ण शरीर ताणले जाते. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे रहा. आता दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेवा. त्यानंतर, दीर्घश्वास घेऊन हात वर करा आणि ताणून घ्या.
आता दोन्ही पायांच्या टाचा उंचावताना पायाच्या बोटांवर उभे राहा. आता या स्थितीमध्ये तुम्हाला शरीराच्या प्रत्येक भागात ताण जाणवेल. आता काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. हे योगासन १० ते १५ वेळा नियमितपणे करा तुमचा थकवा काही दिवसांमध्ये दूर होईल. (Tadasana)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.